Shambhuraj Desai Criticize Ajit Pawar Group : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. ही लढाई गुरूवारी कॅबिनेटच्या बैठकीतही (Cabinet Meeting) पोहोचली होती. यावरून शिंदे (Eknath Shinde) आणि पवारांच्या (Ajit Pawar) नेत्यांमध्ये धुसफुस झाल्याची चर्चा आहे. असे असताना आता ''राज्यातील ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे. पण आमच्या घटक पक्षाने प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला. एक शब्द काय जड नव्हता'' अशा कठोर शब्दात शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. (ladki bahin yojana eknath shinde minister shambhuraj desai angree on ncp ajit pawar group word chief minister mukhyamantri ladki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
''या योजनेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव देण्याचं ठरलं आणि त्या नावाने योजना संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाली. पण आमच्या महायुतीतल्या एका घटकपक्षाने त्यांच्या पक्षाच्या जाहिराती करताना 'मुख्यमंत्री' हा शब्द वगळला आणि नुसत लाडकी बहीण असा उल्लेख केला. ही बाब आम्हाला खटकली'', असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे 'इतर' योजना बंद?
आता एक शब्द हा काय जड नव्हता, त्या जाहिरातीत टाकायला. त्यात आम्ही महायुतीत असताना सगळ्या गोष्टींचे योग्य ते पालन करतोय. आमच्या सर्व जाहिरातीत आम्ही सर्व नेत्यांचे फोटो लावतोय. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून तसं होत नाही, त्यामुळे याबाबत शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
तसेच अजित पवारांच्या बारामतीत फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेची बॅनरबाजी केली आहे. आता ती जाहिरात मी पाहिली नाही. पण असा दुजा भाव आम्ही केला नाही, करणार नाही, मात्र घटक पक्षांनी असं करू नये, असा सल्ला देखील शंभूराज देसाई यांनी केले आहे. तसेच अजित दादांशी यावर बोलणं झालं नाही. तब्येत बरी नसल्याचं कळलं नंतर नक्कीच भेट घेऊन चर्चा करीन, असे देखील देसाई यांनी म्हटले आहे.
जागावाटपावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, 'आम्ही आमच्या जागा वाटपांचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आणि शिवसेनेचा योग्य मान सन्मान महायुतीत राहिल. तसेच भाजपच्या केंद्रीय बड्या नेत्यांनी सांगितलं की ही निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे मोठा वाटा राहिलचं, मात्र माझं मत आहे की पुढेही शिंदेच मुख्यमंत्री रहावेत,असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Shivaji Maharaj Statue: ''जो चूक करतो, तोच माफी मागतो'', पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी PM मोदींवर भडकले
मराठा आरक्षणाबाबत मी जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे. सरकार किंचीतही दिलेल्या शब्दापासून मागे सरकरणार नाही, असे देखील शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT