Pratap Sarnaik Press Conference : "तुळजापूरला आल्यावर मी पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेतली. काही मंदिरातील पूजाऱ्यांनी आम्हाला तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्याची कॉपी दिली. माझ्याकडे सुद्धा त्यांनी तक्रार अशी केली की तुळजापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात माफियांचा सुळसुळाट झाला आहे. त्यात अनेक लोकांचा सहभाग आहे. अशी परिस्थिती तुळजापूर सारख्या देवस्थानमध्ये होत असेल, तर ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे. त्या गोष्टीचा निषेध करायला हवा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी याबाबत नापसंती व्यक्ती केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील असल्याने या विषयावर त्यांनी लक्ष घालण्याच्या सूचना मला दिल्या आहेत. तुळजापूर, धाराशिवमधून ड्रग्ज तस्करांचा नायनाट करण्याची जबाबदारी आजपासून मी घेतलेली आहे, असं मोठं विधान मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केलं.
ADVERTISEMENT
प्रताप सरनाईक म्हणाले, "कोणताही ड्रग्ज तस्कर असूद्या त्याला कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप असू द्या, त्याला जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही. तशा सूचना मी पोलिसांना दिलेल्या आहेत. यामध्ये पोलीस किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याता सहभाग असेल, तर दोघांनाही आतमध्ये टाकायला प्रताप सरनाईक कमी पडणार नाही. एसपींना मी स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की मला आजपासून 72 तासात लेखी स्वरुपात सर्व माहिती हवी आहे. जे ड्रग माफिया मोकाट असतील, त्यांना आत टाकायची जबाबदारी सुद्धा घेतली आहे. नाहीतर मी स्थानिक पोलिसांवरच कारवाई करण्याच्या सूचना करणार आहे".
हे ही वाचा >> Dhananjay Munde : अंजली दमानियांनंतर RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचेही धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
तुळजापूर येथील पुजाऱ्याने ड्रग्ज तस्करीवरून तक्रार केली होती. बैठकीतून बाहेर पडताच मंत्री सरनाईक चांगलेच संतापले. बैठकीवरून बाहेर पडताच मंत्री सरनाईक चांगलेच संतापले होते. तक्रारदारांना धमक्या द्याल तर याद राखा, असं म्हणत सरनाईकांनी पोलिसांनाही सुनावलं. आरोपींना आत टाकलं नाही, तर तुमचीच तक्रार करणार, असा इशाराही सरनाईकांनी पोलिसांना दिलाय.
हे ही वाचा >> Crime : मॅट्रिमोनिअल साईटवरुन फसणूक, दिल्लीचा पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात अनेक महिलांना फसवलं
ADVERTISEMENT
