OBC Reservation : पंकजा मुंडेंचं आतातरी मुख्यमंत्री शिंदे ऐकणार का?

भागवत हिरेकर

21 Jun 2024 (अपडेटेड: 21 Jun 2024, 01:16 PM)

Pankaja Munde OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा राज्यात तापला आहे. त्यात आता पंकजा मुंडे यांनी उडी घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कात्रीत अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पंकजा मुंडे यांनी एकनाथ शिंदेंकडे केली मोठी मागणी.

पंकजा मुंडे आणि एकनाथ शिंदे

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंकजा मुंडेंची एकनाथ शिंदेंकडे मागणी

point

ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचे उपोषण

point

पंकजा मुंडे याचे शिंदे, फडणवीस, पवारांना पत्र

OBC Reservation Latest Update : मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे. त्यांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, या मनोज जरांगेंच्या मागण्यांना आता ओबीसी समाजातून तीव्र विरोध होताना दिसतोय. याविरोधात आता लक्ष्मण हाकेंसह ओबीसी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. याकडे पंकजा मुंडे शिंदे सरकारचं सातत्याने लक्ष वेधून घेत आहे. मुंडेंनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखांनी उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची मागणी केलीये. त्यामुळे शिंदे आतातरी पंकजा मुंडेंचं ऐकणार का? प्रश्न चर्चिला जात आहे. (Pankaja Munde has demanded that Eknath Shinde should go and meet the OBC reservation hunger strike laxman hake in Wadigodri)

हे वाचलं का?

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांना आश्वासने देत त्यांचे उपोषण सोडले होते. मात्र, जेव्हा ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आंदोलनाला बसले, तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी ही तत्परता दाखवली नाही. यावरूनच पंकजा मुंडे शिंदे सरकार कोंडी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

आरक्षणासाठी उपोषण... पंकजा मुंडेंचा मुद्दा काय?

लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर सरकारकडून त्याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी 17 जून रोजी एक ट्विट केले. 

"प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे."

पंकजा मुंडे यांनी सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधून घेताना एक गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केलाय, तो म्हणजे "सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते."

हेही वाचा >> पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू 

जसे मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल मुख्यमंत्री शिंदे अंतरवाली सराटी गेले. तसेच इथेही शिंदेंनी स्वतः जावे, असे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. 

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि पवारांना पत्र

या ट्विटनंतर पंकजा मुंडे यांनी 19 जुलै रोजी पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधले. पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले. या पत्रातही पंकजा मुंडेंचा रोख हा लक्ष्मण हाकेंना जाऊन भेटा, असाच होता. 

सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण करत असलेल्या लक्ष्मण हाके याची वडीगोद्री येथे जाऊन भेट घेतली. आधी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेले. पण, या भेटीबद्दल पंकजा मुंडे समाधानी नसल्याचे दिसले. कारण पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा एक ट्विट केलंय. 

पंकजा मुंडे मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाल्या... 

"राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे."

हेही वाचा >> भाजपच्या कोअर कमिटी मीटिंगमध्ये मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय

"सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत."

हेही वाचा >> 'विधानसभेत 100 जागा मिळाल्या नाहीतर...', रामदास कदमांचा इशारा; महायुती टिकणार?

"शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल, अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे."

एकनाथ शिंदे वडीगोद्रीला जाणार का?

पंकजा मुंडे सातत्याने राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष्मण हाके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घ्यावी अशीच मागणी करताहेत. शिंदे हे मराठा समाजातून येतात. तिथे जाऊन त्यांनी काही आश्वासने दिली, तर मराठा समाजाची नाराजी ओढवली जाण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या शिंदे कात्रीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

    follow whatsapp