Rohini Khadse : राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहिणी खडसे (Rohini khadase) यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी ज्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती झाली आहे, त्या नेमक्या कोण आहेत. हे आता जाणून घेऊया. शरद पवारांनी महाराष्ट्रात एवढी मोठी जबाबदारी रोहिणी खडसे यांच्यावरच का सोपवली आहे हेही या निमित्ताने आता जाणून घेऊया. (rohini khadse appointed nationalist congress party women aghadi state president)
ADVERTISEMENT
उच्च शिक्षित रोहिणी खडसे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. रोहिणी खडसे यांना 29 रोजी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात नियु्क्तीचे पत्र देण्यात आले आहे. ॲड. रोहिणी खडसे या माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्या उच्च शिक्षित असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर त्यांचे पदव्युत्तर वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी, तर पुणे विद्यापीठातून एलएलएम पर्यंत झालेले आहे.
हे ही वाचा >> Sunil Raut : ‘आजही मला 100 कोटींची ऑफर, पण…’; सुनील राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
अल्पशा मतांनी पराभव
अड. रोहिणी खडसे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी आमदार खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
जळगाव जिल्हा बँकेत मोलाचं काम
राजकारणाबरोबर त्या सामाजिक, सांस्कृति, शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा मध्य बँक ऑडिट मध्ये ” ड” दर्जा वरून” अ” दर्जामध्ये आली होती. त्यांच्या कार्यकाळात बँकेचे संगणकीकरण, एटीएम , सीबीएस प्रणाली सेवा सुरू झाली होती तसेच बँकेच्या ठेवीमध्ये आणि भाग भांडवलामध्येही वाढ झाली होती.
बँकेची प्रगती
रोहिणी खडसे अध्यक्षपदी असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेने आघाडी घेऊन विविध क्षेत्रात पुरस्कारी मिळवले होते. त्याचबरोबर मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी आमदार एकनाथराव खडसे यांनी स्थापना केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
हे ही वाचा >> सुषमा अंधारेंची आशिष शेलारांवर टीका
संस्था आणि मिळालेली पदं
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या ॲड. रोहिणी खडसे उपाध्यक्षही आहेत. याचबरोबर त्या मुक्ताईनगर परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगरच्या अध्यक्षा आहेत यासंस्थे अंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या ॲड. रोहिणी खडसे कार्याध्यक्ष आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाच्या माजी सदस्या असून अखिल भारतीय नाट्य परिषद खा जळगावच्या ॲड. रोहिणी खडसे अध्यक्षा म्हणुन काम पाहत आहेत.
पक्षाची सदस्य नोंदणीही जोरदार
तर मुक्ताईनगर परिसरात सामजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी रोहिणी खडसे यांच्याकडून जोरदार मेहनत घेतली जात आहे. त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गावं, वस्त्या आणि पाड्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला होता. त्याचबरोबर शिवाय पक्षाची सदस्य नोंदणी केली होती.
कापुस, केळी कांदा व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चाही त्याकाळी लक्षवेधी ठरला होता. त्यांचे पक्ष कार्य आणि संघटन कौशल्य पाहून राष्ट्रवादीकडून त्यांना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
ADVERTISEMENT