Ram Mandir : राऊतांचा मोदी सरकारवर हल्ला, ‘रामाची पूजा करतात आणि रावणाचं…’

मुंबई तक

20 Jan 2024 (अपडेटेड: 20 Jan 2024, 05:01 PM)

ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, पण तुम्हाला फक्त एक इवेंट करायचा आहे. म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिलीत. पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्वाचा संबंध आणि संघर्ष होता.

sanjay raut criticize modi government ram mandir inaugration invitation udhhav thackeray

sanjay raut criticize modi government ram mandir inaugration invitation udhhav thackeray

follow google news

Sanjay Raut criticize Modi government : प्रवीण ठाकरे, नाशिक :   उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर प्रतिनिधीच्या न्यासाने स्पीड पोस्टने उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचे (ram mandir inaugration) निमंत्रण पाठवल्याचे माहिती समोर आली आहे. राम मंदिर सोहळ्याच्या या निमंत्रणावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी महत्वाचा संबंध आणि संघर्ष असताना, त्यांच्याशी अशाप्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला संजय राऊतांनी मोदी सरकारवर केला आहे. (sanjay raut criticize modi government ram mandir inaugration invitation udhhav thackeray)

हे वाचलं का?

22 जानेवारी आणि 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा होणार आहे. या दौऱ्यासाठी पाहणी करायला संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावर भाष्य केले. ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, पण तुम्हाला फक्त एक इवेंट करायचा आहे. म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिलीत. पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्वाचा संबंध आणि संघर्ष होता. त्यांच्याशी अशाप्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. रामाची पूजा करतात आणि रावणाचे राज्य चालतात, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.

हे ही वाचा : जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा, ‘पप्पा मुंबईत पोहोचले तर घराबाहेरही पडता येणार नाही’

शनिवारी दुपारी अखेर उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. स्पीड पोस्टने निमंत्रणपत्रिका पाठवून उद्धव ठाकरेंना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे महासचिव चंपतराय यांनी निमंत्रित केले असल्याचे समजते. उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्ष भेटीची वेळ न दिल्याने रामजन्मभूमी न्यासाने निमंत्रण कुरियर केले आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर! वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडलं?

देशाचे पंतप्रधान नाशिकला येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरले. पंतप्रधान आणि भाजप जो वीर सावरकर वीर सावरकर असा राजकीय जप करत असतो. पंतप्रधान इथे रोडशो साठी आले पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही. ते काळाराम मंदिरात गेले, काळाराम मंदिराच्या संघर्षाशी डॉ. आंबेडकरांचा, दादासाहेब गायकवाड यांचा जवळचा संबंध आहे. पण आम्हाला असं विस्मरण होणार नाही. उद्धव ठाकरे वीर सावरकरांच्या स्मारकावर जातील. तिथून काळाराम मंदिरात दर्शन घेतलं जाईल, पूजा केली जाईल. त्यानंतर रामकुंडावर, गोदावरीवर गंगाआरती केली जाईल, असा आमचा 22 तारखेचा कार्यक्रम आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

    follow whatsapp