Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो ‘टेबल’वर, राऊतांच्या ‘त्या’ फोटोने राजकारण पेटलं

प्रशांत गोमाणे

20 Nov 2023 (अपडेटेड: 20 Nov 2023, 12:29 PM)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका कसीनोचा फोटो ट्विट केला होता. या फोटोतील व्यक्तीचे नाव गुपीत ठेवत राऊतांनी खळबळ उडवून दिली होती. यातचं भाजप फसली आणि नेत्याचे नाव सांगून बसली. या फोटोवरूनच आता सोशल मीडियावर भाजप शिवसेनेते युद्ध पेटलं आहे.

sanjay raut shivsena bjp twitter war chandrashekhar bawankule casino photo aditya thackeray whiskey thackeray group bjp twitter war

sanjay raut shivsena bjp twitter war chandrashekhar bawankule casino photo aditya thackeray whiskey thackeray group bjp twitter war

follow google news

BJP vs Shiv sena war Chandrashekhar Bawankule VS Sanjay Raut Aditya Thackeray : राज्यात महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना आता एका वेगळ्याच मुद्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) एका कसीनोचा फोटो ट्विट केला होता. या फोटोतील व्यक्तीचे नाव गुपीत ठेवत राऊतांनी खळबळ उडवून दिली होती. यातचं भाजप फसली आणि नेत्याचे नाव सांगून बसली. या फोटोवरूनच आता सोशल मीडियावर भाजप शिवसेनेते (BJP VS shiv sena UBT) युद्ध पेटलं आहे. त्यामुळे नेमका हा वाद काय आहे, तो जाणून घेऊयात. (sanjay raut shivsena bjp twitter war chandrashekhar bawankule casino photo aditya thackeray whiskey thackeray group bjp twitter war)

हे वाचलं का?

हिंदुत्ववादी महाशय..

खंर तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक फोटो ट्वीट केला होता. हा फोटो मकाऊतील कसीनोचा होता. या फोटोच्या कॅप्शनला, ‘महाराष्ट्र पेटलेला आहे…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…, असे लिहून संजय राऊतांनी सस्पेन्स कायम ठेवला.

हे ही वाचा : धक्कादायक… मुंबईत सुटकेसमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, कशी केली हत्या?

या ट्विटच्या लगोलग राऊतांनी आणखीण एक ट्वीट केले. ज्यामध्ये राऊतांनी मुक्काम पोस्ट मकाऊ असे लिहत कसीनोचा पत्ताच सांगितला. आणि कसीनोत संबधित व्यक्तीने 3.50 कोटी रूपये जुगारात उडवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितल्याचे राऊतांनी म्हटले. तसेच पुढे राऊतांनी हिंदुत्ववादी महाशय असल्याची ओळख सांगत सस्पेंन्स आणखीणच वाढवला. आणि खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असे म्हणत राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, संजय राऊतांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये संबंधित नेत्याचे नाव कुठेच घेतले नव्हते. फक्त हे ट्वीट भाजपला टॅग करण्यात आले होते.

हे ही वाचा : ICC World Cup Playing 11 : कमिन्सला डच्चू, टीम इंडियाचा डंका! ‘या’ 6 भारतीय ICC च्या संघात

भाजनकडूनच नेत्याच नावच जाहिर

राऊतांनी टाकलेल्या या आरोपांच्या जाळ्यात उत्तर देताना मात्र भाजप फसली आणि नेत्याची नावच जाहीर करून मोकळी झाली. भाजपने राऊतांना ट्वीट करून उत्तर देताना ट्वीटमध्ये म्हटले की,आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तिथला हा परिसर असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही, असा प्रतिहल्लाही भाजपाने राऊतांवर केला. तसेच आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणती व्हिस्की आहे? असा सवाल भाजपाने राऊतांना करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.

फॅमिली चिनी आहे का?

भाजपने दिलेल्या उत्तरावर आता राऊतांनी पुन्हा हल्ला चढवला आहे. राऊतांनी ट्वीट करत म्हटलं की, तर म्हणे..फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची फॅमिली चिनी आहे का? असा सवाल राऊत यांनी भाजपला पुन्हा घेरलं. आणि जर कधीच जुगार खेळले नाहीत..मग टेबलावर काय मारुती स्तोत्र आहे का? असा रोखठोक सवालचं केला. झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, असे म्हणत राऊंतानी भाजपला थेट इशाराच दिला.

दरम्यान आता या फोटोवरून राजकारण चांगलचं पेटलं आहे. भाजपचे अनेक नेते चंद्रशेखर यांच्या बचावासाठी पुढे आले आहे.या फोटोवरून विरोधकांनी भाजपला चांगलचं घेरलं आहे.

    follow whatsapp