पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र येणार का? गोविंद बागेत पाडव्याची जय्यत तयारी पण…

मुंबई तक

• 01:28 PM • 13 Nov 2023

पवार कुटुंबीयांच्या दिवाळीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे कारण यावर्षीच्या दिवाळीत अजितदादांनी राजकीय वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या दिवाळीत अजित पवार उपस्थित राहणार की नाही याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sharad Pawar and family prepare for Diwali at Govind Bagh but will Ajit Pawar be present

Sharad Pawar and family prepare for Diwali at Govind Bagh but will Ajit Pawar be present

follow google news

Pawar Family : राज्यात दिवाळी (Diwali) सण साजरा होत असताना तो अनेक अर्थाने विशेष ठरत असतो. कधी सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमुळे तर कधी राजकीय नेत्यांमुळेही (Political Leader) दिवाळी विशेष ठरत असते. यंदांची दिवाळी अनेकार्थाने वेगळी ठरणारी आहे. कारण राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना पवार कुटुंबीयांच्या दिवाळीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. कारण शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार यांच्यामुळे पवार कुटुंबीयांच्या दिवाळीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे वाचलं का?

गोविंद बागेत तयारी पाडव्याची

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने उद्या पवार कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी राज्यभरातले असंख्य कार्यकर्ते येत असतात. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत सध्या पाडव्याची तयारी करण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहित पवार यांच्यासह पवार परिवारातील सर्व सदस्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात.

हे ही वाचा >> Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंनीच मला गुहागरमधून पाडलं’, कदमांनी सांगितली Inside Story

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर…

राज्यातील जनतेसाठी आणि राजकीय नेत्यांसाठी मात्र यंदाचा पाडवा विशेष आहे. कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना भेटू शकणार नाही असं अजित पवारांनी माध्यमांना कळवलं होतं. मात्र त्यापूर्वी पुण्यात झालेल्या पवार कुटुंबातील दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते.

भेटीगाठीची साशंकता

त्याचबरोबर बारामतीत झालेल्या पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या शारदास्तव या कार्यक्रमालादेखील पवारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे उद्या गोविंद बागेत अजित पवार उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. अजित पवार आता पवार कुटुंबीयांसोबत दिवाळीला हजर राहणार की नाही असा प्रश्न जनतेला पडला असला तरी आजच्या कार्यक्रमामुळे उद्याच्या कार्यक्रमाबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा >> दिवळी दिवशीच प्रायव्हेट पार्टजवळ फटाके फोडले, अन् घडलं भयंकर…

 

    follow whatsapp