Sonia Gandhi या राज्यातून जाणार राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई तक

13 Feb 2024 (अपडेटेड: 13 Feb 2024, 11:05 PM)

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेला जाणार असून त्या 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

sonia gandhi rajya sabha

sonia gandhi rajya sabha

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोनिया गांधी उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार

point

Sonia Gandhi राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार

point

सोनिया गांधी पहिल्यांदाच जाणार राज्यसभेवर

Rajysabha Election : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेला जाणार आहेत. राजस्थानमधून त्यांचे राज्यसभेवर जाण्याचे निश्चित झालं आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गेही (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार आहेत. 

हे वाचलं का?

 राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक

देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. त्याची 29 जानेवारी रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली. तर यावेळी 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार असून यापैकी राजस्थानमधील तीन जागांवर सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रियाही सुरू झाली आहे. 

मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण

माजी मुख्यमंत्री मनमोहन सिंह यांची राजस्थानमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, यावेळी त्यांनी नकार दिल्याने मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही जागा रिक्त होणार आहे. काँग्रेसच्या या राखीव जागेवर निवडणुकीसाठी नवीन उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. मात्र त्यासाठी सोनिया गांधी यांचे नाव सुचवण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Balasaheb Thorat: 'चव्हाण भाजपात का गेले हे चौकातील सामान्य माणूसही सांगेल'

सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर

ज्या 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यापैकी 10 जागा काँग्रेससाठी राखीव आहे. म्हणजेच या जागांवर काँग्रेसचे उमेदवारही निवडून येणार हे निश्चित आहे. त्यामध्ये राजस्थानची एक जागाही येते. या जागेवरून सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार असून सोनिया सध्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

14 उमेदवारांची नावं जाहीर

नुकताच भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील आपल्या 14 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर उत्तर प्रदेशातील सुधांशू त्रिवेदी आणि आरपीएन सिंग यांच्याशिवाय पक्षाने यूपीमधून एकूण 7 उमेदवारांची नावंही जाहीर केली होती. तर त्याचवेळी पक्षाकडून सुभाष बराला यांना हरियाणातून उमेदवार म्हणून घोषित केले होते.

भाजपचे उमेदवार

भाजपने यूपीमधून आरपीएन सिंग, सुधांशू त्रिवेदी, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, नवीन जैन यांच्याही नावाची घोषणा केली आहे. तर पश्चिम बंगालमधून समिक भट्टाचार्य, उत्तराखंडमधून महेंद्र भट्ट, कर्नाटकातून नारायण कृष्णसा भांडगे आणि छत्तीसगडमधून देवेंद्र प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   

हे ही वाचा >>'देवेंद्र फडणवीस निर्लज्जम सदासुखी' ठाकरेंचा घणाघात

उत्तर प्रदेशाच्या 10 जागा रिक्त

उत्तर प्रदेशमधून राज्यसभेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. यापैकी भाजपने 7 जागांवर तर समाजवादी पक्षाने 3 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. समाजवादी पक्षाकडून जया बच्चन, रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन यांना राज्यसभेचे उमेदवार केले आहेत. आलोक रंजन हे अखिलेश यादव यांचे सल्लागार आहेत आणि ते पडद्यामागील मुख्य सूत्रधारही मानले जातात. तर जया बच्चन यांचे यादव कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. तर दुसरीकडे अखिलेश रामजीलाल सुमनच्या माध्यमातून दलित समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हं आहेत. 
 

काँग्रेसला राज्यसभेच्या किती जागा ?

बिहार-1
महाराष्ट्र-1 
मध्य प्रदेश-1
राजस्थान-1
हिमाचल प्रदेश-1
तेलंगणा-2
कर्नाटक-3

    follow whatsapp