नवी दिल्ली: भाजप खासदार कंगना रणौतांचं संसदेत पहिलं भाषणं खूपच प्रभावी ठरलं. दोनच मिनिटात त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्या म्हणाल्या, "मी माझ्या आणि मंडीच्या लोकांच्या वतीने तुमचे मनापासून अभिनंदन करते." भाजपच्या नव्याने खासदार बनल्यानंतर, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या भाषणाची सुरुवात अशा प्रकारे केली.
ADVERTISEMENT
कंगनाला पहिल्यांदाच संसद भवनात बोलण्याची संधी मिळाली. तिने आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठवला. गुरुवारी कंगना राणौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये कंगना पहिल्यांदाच संसद भवनात भाषण करताना दिसत आहे. या भाषणादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कंगनाला खासदार म्हणून बोलण्यासाठी आमंत्रित करतात.
ADVERTISEMENT