Ramdas kadam speech Video : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी भाजपने टाकलेल्या दबावाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला भाजपने उमेदवार बदलायला लावले, या गोष्टीवरही कदमांनी शिक्कामोर्तब केले. इतकंच नाही, तर आता मोदी शाहांना सांगा. मला घेऊन चला मी सांगतो असे म्हणत शिवसेनेच्या घटलेल्या जागांचं खापर भाजपवर फोडले. (Ramdas Kadam Full Speech)
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका असे सांगत असतानाच रामदास कदमांनी हात जोडले.
ते म्हणाले, "एक हात जोडून विनंती शिंदे साहेबांना आहे. आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा. हात जोडून विनंती आहे. मला माहितीये या विषयावर कोणी बोलणार नाहीये. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शाह साहेबांकडे... मी सांगेन की, साहेब जसे भाजपचे दोन महिने आधी उमेदवार दिले. तसे शिंदे साहेबांचे १५ उमेदवार दोन महिन्यांआधी दिले असते, तर आज चित्र वेगळे दिसले असते."
हेही वाचा >> शिंदेंना संपवू शकणार नाही, मुख्यमंत्र्यांचा नेमका रोख कुणावर?
"माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती. माझा हेमंत दिल्लीत गेला असता. नाशिकचा आमचा गोडसे दिल्लीत गेला असता. पण, एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली. आमची जागा... आमची जागा... अरे भानगड काय?"
"शिंदे साहेब, हे थांबवा. नाहीतर मला घेऊ जा. मला घेऊ जा. शिंदे साहेब, मोदी साहेबांना सांगा. शाह साहेबांना सांगा की, मला 100 उमेदवार द्या. 90 आपण आमदार निवडून नाही आणले, तर तुम्ही सांगाल ते आम्ही करू. घ्या. शिंदे साहेब मागून घ्या", अशी मागणी कदम यांनी केली.
ADVERTISEMENT