Anil Desai latest news : शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणखी एक नेता चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. त्यांना ५ मार्च रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता संजय राऊत, अनिल परब, रवींद्र वायकर आणि इतर नेत्यांबरोबर आता अनिल देसाईंभोवतीही चौकशीचा फास पडला पडला आहे.
ADVERTISEMENT
अनिल देसाईंची चौकशी... प्रकरण काय?
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एक तक्रार दिली होती. शिवसेना पक्षाचा निधी ठाकरे गटाकडून वापरला जात आहे. त्याची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार शिंदेंच्या शिवसेनेने केली.
एकनाथ शिंदे यांचा गट हीच मूळ शिवसेना आहे, असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. धनुष्यबाण चिन्हही आयोगाने दिले. पक्ष नाव आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या निधीमधून ५० कोटी रुपये काढले, अशी शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. याच प्रकरणात आता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाई यांना चौकशीसाठी बोलवले आहे.
ADVERTISEMENT