Astro: कपाळावर टिळा लावल्याने बदलतं नशीब! तुम्हालाही होईल प्रचंड फायदा

मुंबई तक

कपाळावर टिळा लावणं ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर एक वैज्ञानिक आणि ज्योतिषीय चमत्कार देखील आहे. जाणून घ्या टिळा लावण्याचे योग्य नियम आणि फायदे!

ADVERTISEMENT

कपाळावर टिळा का लावावा?
कपाळावर टिळा का लावावा?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कपाळावर टिळा लावण्याचे फायदे

point

ज्योतिषशास्त्रानुसार, कपाळावर टिळा लावण्याच्या योग्य पद्धती

point

जीवनात सकारात्मक बदलांसाठी कपाळावरील टिळा कारणीभूत

Astro Tips: अमन नेहमी आत्मविश्वासाने त्याची कामं करत असायचा. मात्र, सध्या त्याल खूप विचित्र आणि वाईट अनुभव येत होते. कामात व्यत्यय, लक्ष विचलित होणे आणि मानसिक अस्वस्थता अशा बऱ्याच अडचणी त्याच्या आयुष्यात येत होत्या. एके दिवशी त्याच्या आजोबांनी त्याला दररोज टिळा लावण्याचा सल्ला दिला. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे, अमनने ते करून पाहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने नियमितपणे चंदन आणि केशरचा टिळा लावायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकाग्रता तर वाढलीच पण त्यासोबतच आसपासचे वातावरणसुद्धा सकारात्मक झाले.

प्रसिद्ध ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांच्या मते, टिळा लावणे ही हिंदू परंपरेतील एक विशेष प्रथा आहे. टिळा लावल्याशिवाय पूजा करण्याची परवानगी नसते आणि ते लावल्याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. याशिवाय, टिळा लावल्याने कुंडलीत कोणतेही नकारात्मक ग्रह असतील तर ते देखील सुधारतात. ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी टिळा लावण्याची योग्य पद्धत, नियम आणि त्याचे विविध प्रकारचे फायदे सांगितले आहेत. याविषयी, सविस्तर जाणून घेऊया.

टिळा लावण्याचे नियम

टिळा लावण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंघोळ करण्याआधी कधीच टिळा लावू नये. सकाळी अंघोळ करुन व्यवस्थित तयार व्हा. त्यानंतर पूजा करुन टिळा लावण्यास सुरूवात करा. पूजा करताना आधी देव्हाऱ्यातील देवाला जसे की भगवान कृष्ण किंवा नारायणाला मानत असलेल्यांनी त्यांना सर्वप्रथम टिळा लावा आणि त्यानंतर  स्वत:ला लावा.

हे ही वाचा>> घरात ठेवलेली एक छोटी लवंग बदलेल तुमचं नशीब! आहेत प्रचंड चमत्कारिक फायदे

हातांवरील बोटांचा वापर

स्वत:ला टिळा लावायचा असल्यास अनामिका म्हणजेच रिंग फिंगरचा वापर करा आणि दुसऱ्याला टिळा लावायचा असल्यास अंगठ्याचा वापर करा.

झोपण्याच्या आधीचा नियम

कधीच टिळा लावून झोपू नये. असे केल्याने, तुमचे आज्ञा चक्र म्हणजेच कपाळाचा मध्य भाग सक्रिय राहतो. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण, हे चक्र मस्तिष्कात झोपेसाठी कारणीभूत असणाऱ्या रसायनांना प्रभावित करते.

हे ही वाचा>> Astro: 7 उपाय करा पती-पत्नीमध्ये भांडणं होणारच नाही, या टिप्स आहेत खूप कामाच्या!

विविध प्रकारचे टिळक आणि त्यांचे लाभ

टिळा लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साम्रगीच्या आधारावर त्याचे वेगवेगळे फायदे देखील आहे. 

श्वेत चंदन: याचा टिळा कपाळावर लावल्याने एकाग्रता वाढते.

लाल चंदन: यामुळे शक्ती आणि विजयाची प्राप्ती होण्यास मदत होते.

कुंकू: कुंकवाचा टिळा लावल्याने आकर्षण वाढतं आणि आळस दूर होतो.

केशर: हा टिळा यशासाठी कारणीभूत ठरत असून तो लावल्याने प्रलंबित कार्यात यश मिळण्यास मदत होते. 

गोरोचन: या गायीशी संबंधित पदार्थाचा टिळा विजय प्राप्तीसाठी लाभदायक ठरतो.

अष्टगंधा: ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढविण्यास मदत करते.

भस्म किंवा राख: अपघात आणि खटल्यांपासून संरक्षण करते. विशेषतः शिवभक्त याचा वापर करतात.

ग्रह मजबूत बनवण्यासाठी टिळा:

वेगवेगळ्या ग्रहांची शक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट टिळा लावण्यासाठी आणि योग्य त्या बोटांचा वापर करा 

सूर्य: अनामिका बोटाने (रिंग फिंगर) लाल चंदनाचा टिळा.
 
चंद्र: करंगळीचा वापर करुन पांढऱ्या चंदनाचा टिळा.
 
मंगळ: धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनामिका बोटाने ( रिंग फिंगर) केशरी सिंदूरचा टिळा लावा.

बुध: करंगळीच्या साहाय्याने अष्टगंध टिळा.
 
गुरु:
पहिले बोट म्हणजेच तर्जनी (इंडेक्स फिंगर) च्या साहाय्याने केशराचा टिळा लावा.
 
शुक्र: अनामिका बोटाने  (रिंग फिंगर) रोली आणि तांदळाचा टिळा लावा.

शनि, राहू, केतू: उदबत्ती किंवा कोळशाच्या राखेने त्रिपुंड टिळा लावा.


आकर्षण आणि विजय प्राप्तीसाठी या पद्धतीने विशेष टिळा

आकर्षणासाठी: 
तांब्याच्या भांड्यात रोली आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. प्रथम श्रीकृष्णाला टिळक लावा, नंतर स्वतःला लावा. हे वापरल्यानंतर, मांस आणि मद्य टाळा. हा टिळा प्रभाव वाढविण्यास आणि लोकांना आकर्षित करण्यास मदत करतो.

विजय आणि शक्तीसाठी: 
लाल चंदन बारीक करा आणि ते चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यात ठेवा. दुर्गा मातेसमोर "ॐ दुर्गायै नमः" या मंत्राचा 27 वेळा जप करा. ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि कपाळावर तसेच हातांवर गोलाकारपणे लावा. ते यश आणि विजय प्राप्तीसाठी प्रभावी ठरते.

टिळ्याचे महत्त्व:
टिळा लावल्याने केवळ एकाग्रता आणि मनःशांती वाढते असे नाही तर ते सखोल ध्यान आणि उपासनेत देखील मदत करते. तसेच, ते आकर्षण आणि आत्मविश्वास वाढवते. योग्य नियम आणि घटकांसह टिळक लावल्याने तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकता.

(टीप: इथे देण्यात आलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून मुंबई Tak याची पुष्टी करत नाही. )

हे वाचलं का?

    follow whatsapp