Astro Tips: करिअरमध्ये यश मिळत नाही? आठवड्यातून एकदा करा 'हा'उपाय

मुंबई तक

Astro tips for career:अनेकदा आपल्या करिअरमध्ये अडचणी येत असल्यामुळे आपली हवी तशी प्रगती होत नाही. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश संपादन करायचे असल्यास ज्योतिषींचा 'हा' उपाय अगदी रामबाण ठरू शकतो.

ADVERTISEMENT

Astro Tips
Astro Tips
social share
google news

बातम्या हायलाइट

point

करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी ज्योतिषांचा उपाय

point

करिअरमध्ये प्रगती कशी साधायची?

point

करिअरमध्ये हवं तसं यश संपादन करण्यासाठी काय करावे?

Astro Tips: अनेकदा आपल्या करिअरमध्ये अडचणी येत असल्यामुळे आपली हवी तशी प्रगती होत नाही. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश संपादन करायचे असल्यास ज्योतिषी प्रविण मिश्रा यांचा 'हा' उपाय अगदी रामबाण ठरू शकतो. त्यांच्या मते, शुक्रवारच्या दिवशी भगवान शंकराची विशिष्ट पद्धतीने पूजा केल्यास आणि काही सोप्या उपायांचा अवलंब केल्यास करिअरमधील अडथळे दूर करता येऊ शकतात. तसेच, असे केल्याने यशाचे नवीन मार्ग सुद्धा दिसू लागतात. या प्रभावी उपायाविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

शुक्रवारी करा भगवान शंकराचा अभिषेक

ज्योतिषी प्रविण मिश्रा यांच्या मते, करिअरमध्ये उत्तम प्रगती साधायची असल्यास शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम दूर होतात पण यासोबतच जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे पाहायला मिळतात. पूजा करण्याची 'ही' पद्धत जाणून घ्या.

हे ही वाचा: Vastu Tips: बेडरूममध्ये कोणत्या रंगाचा Bulb लावावा?

साहित्य: गंगा जल, साखर मिसळलेलेल दूध, तांदूळ, बेलपत्र, पांढरी मिठाई.

पद्धत:

  • सर्वप्रथम भगवान शंकराच्या शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करा.
  • यानंतर साखर मिसळलेल्या दुधाने अभिषेक करा आणि पुन्हा शिवलिंगावर गंगाजलाच्या साहाय्याने अभिषेक करा.
  • शिंवलिंगावर टिळा लावा आणि त्यावर अक्षता (तांदूळ) अर्पण करा.
  • 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करताना कमीत कमी 21 बेलाची पाने अर्पण करा.
  • भगवान शंकराची आरती करा आणि करिअरमध्ये यश मिळावे म्हणून प्रार्थना करा.
  • शेवटी, 11 मुलींना प्रसाद म्हणून पांढरी मिठाई वाटा.

या उपायाचे फायदे

प्रविण मिश्रा यांच्या मते, दर शुक्रवारी नियमितपणे हा उपाय केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतात आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतात. मुलींना प्रसाद वाटल्याने त्यांचे देखील आशीर्वाद मिळतात. हा उपाय केल्याने प्रगतीचा मार्ग आणखी मजबूत होतो.

हे ही वाचा: Vastu Tips: पर्समध्ये ठेवा फक्त 'या' 5 वस्तू; पैशांची समस्या होईल दूर

कोणत्या लोकांसाठी 'हा' लाभदायक?

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, नोकरीमध्ये अडचणी येत असलेल्यांना तसेच करिअरमध्ये अडथळ्यांचा सामना करण्यांना हा उपाय अतिशय लाभदायक ठरेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp