Personal Finance: गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कसा असावा? 'हा' 100 मायनस रूल ठरेल अचूक आणि फायदेशीर

मुंबई तक

Personal Finance: तुम्हाला तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ योग्यरित्या बॅलेन्स ठेवायचा असेल तर '100 मायनस' नियम तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. या सूत्राच्या साहाय्याने तुम्हाला योग्यरित्या असेट एलोकेशन करण्यास मदत होईल.

ADVERTISEMENT

गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ कसा असावा?
गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ कसा असावा?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुमचा गुंतवणूकीच्या पोर्टफोलियो कसा असावा?

point

100 मायनस रूल म्हणजे काय?

point

योग्यरित्या असेट एलोकेशन करण्यासाठी 'हे' सूत्र फायदेशीर

Personal Finance: 2025 मध्ये तुम्हाला तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ योग्यरित्या बॅलेन्स ठेवायचा असेल तर '100 मायनस' नियम तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. हे एक साधे आणि अचूक सूत्र आहे. यामुळे तुम्हाला योग्यरित्या असेट एलोकेशन करणे सोपे होईल. 

या नियमानुसार, तुम्हाला तुमचे वय 100 मधून वजा करावे लागेल. यातून जे समोर येईल ते तुमच्या पोर्टफोलिओची इक्विटीज (स्टॉक) मध्ये गुंतवणूक करण्यासाठीची टक्केवारी असेल. उर्वरित रक्कम कर्ज किंवा निश्चित उत्पन्न साधनांमध्ये जायला हवी.

उदा. रघुचे वय 30 वर्षे आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा किती भाग कुठे गुंतवायचा हे त्यांना ठरवता येत नाहीये. शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स जास्त असले तरी त्यात जोखीम असते. त्यांनी आता काय करावे? आता रघु त्याच्या वयानुसार किती धोका पत्करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आपण '100 वजा' नियम वापरूया.

'100 मायनस रूल' म्हणजे काय?

समजा, तुमचे वय 30 वर्षे आहे.
100 - 30 = 70
याचा अर्थ तुमच्या पोर्टफोलिओचा 70 टक्के भाग इक्विटीमध्ये (Stocks, Mutual Funds) गुंतवा.
उर्वरित 30 टक्के रक्कम कर्ज साधनांमध्ये (FD, बॉन्ड्स, PPF) गुंतवावी.

हे ही वाचा: प्रेमविवाहाचा राग, निवृत्त PSI बापाने हळदीच्या कार्यक्रमात लेकीला गोळी घालून संपवलं, तर जावईही...

या नियमाचे फायदे 

1. जोखीम कमी होते.

2. दीर्घकालीन वाढ.
तरुणपणात इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक केल्याने तुमचे भांडवल जलद वाढण्यास मदत होते.

3.सेफ्टी नेट
रिटायरमेंट जवळ आल्यावर कर्ज साधनांमध्ये (डेब्ट इंस्ट्रूमेंट्स) अधिक गुंतवणूक केल्याने तुम्हाला स्थिरता मिळते.

जर तुम्ही 25 वर्षांचे असाल तर

  • इक्विटी गुंतवणूक: 100-25 = 75 टक्के
  • कर्ज गुंतवणूक: 25 टक्के
  • तुमचा पोर्टफोलिओ 75000 रुपये (इक्विटी) + 25000 रुपये (कर्ज) = 100000 रुपये गुंतवणूक 

जर तुम्ही 50 वर्षांचे असाल तर

  • इक्विटी गुंतवणूक: 100-50 = 50 टक्के
  • कर्ज गुंतवणूक: 50 टक्के
  • तुमचा पोर्टफोलिओ 50000 रुपये (इक्विटी) + 50000 रुपये (कर्ज) = 100000 रुपये गुंतवणूक 

जर तुम्ही 60 वर्षांचे असाल तर

  • इक्विटी गुंतवणूक: 100-60 = 40 टक्के
  • कर्ज गुंतवणूक: 60 टक्के
  • तुमचा पोर्टफोलिओ 40000 रुपये (इक्विटी) + 60000 रुपये (कर्ज) = 100000 रुपये गुंतवणूक

'100 वजा' नियम सर्वांसाठी आहे का? 

हा नियम प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक मूलभूत मार्गदर्शक आहे. तुमच्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता यावर अवलंबून हे बदलू शकते.

1. तरुणांसाठी: हा रूल जोखीम घेण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्याची संधी देतो. 

2. रिटायरमेंट जवळ असलेल्यांसाठी: नियमानुसार, कर्ज साधनांमध्ये अधिक गुंतवणूक केल्याने तुम्हाला स्थिरता मिळेल.

3. कस्टमायझेशन: जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत असाल तर तुम्ही इक्विटीची टक्केवारी वाढवू शकता.

हे ही वाचा: मुंबईतील ईडी कार्यालयाला मोठी आग, 'त्या' फाईल जळाल्या की वाचल्या?

तज्ज्ञांचे मत

'100 वजा नियम' हा एक सोपा आणि असेट एलोकेशन साधन आहे. हे तुम्हाला वयानुसार गुंतवणूक योजना तयार करण्यास मदत करते. परंतु, प्रत्येक गुंतवणूकदाराने त्यांच्या गरजा आणि उद्दिष्टांनुसार ती कस्टमाइझ करावी. '100 मायनस' नियम तुम्हाला योग्य दिशेने गुंतवणूक करण्यास मदत करतो. जर तुम्ही ते योग्यरित्या स्वीकारले तर 2025 मध्ये तुमचा पोर्टफोलिओ केवळ सुरक्षितच राहणार नाही तर तो नफ्याने भरलेला देखील असेल.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp