Dhule: ठाकरे गटाच्या महिलांनी बँक मॅनेजरला झोडपलं, कॉलर धरुन…
धुळ्यात महिलांना अश्लील मेसेज करणाऱ्या एका बँक मॅनेजरला ठाकरे गटाच्या महिलांनी बेदम मारहाण केली. तसंच त्याला थेट पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलं. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
धुळे: राज्यामध्ये सध्या महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे राज्यात महिला व तरुणी सुरक्षित नसल्याचे अधोरेखित होत असताना धुळे (Dhule) शहरात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील रिलायन्स लाइफ इन्शुरन्स या कंपनीमध्ये असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या नितीन सोमनाथ पाटील याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या (Shiv sena UBT) महिलांनी चांगलाच चोप दिला. एवढंच नाही तर त्याला थेट फरफटत आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. (bank manager obscene messages women dhule brutally beaten shiv sena thackeray group women accused)
ADVERTISEMENT
धुळ्यात नेमकं काय घडलं?
‘मुझे आपसे प्यार है, मै आपको पसंद करता हूँ’ यासारखे अश्लील मेसेज नितीन पाटील हा कंपनीत काम करणाऱ्या महिलेला करत होता. याबाबत महिलेने त्याला समज दिल्यानंतरही त्याने अश्लील मेसेज पाठवणं बंद न केल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे तक्रार केली आणि आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीमध्ये जाऊन या ब्रँच मॅनेजरला चांगलाच चोप दिला. तसेच असे कोणासोबत घडत असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा शुभांगी पाटील यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा >> BMC : ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी, पण ‘या’ गोष्टी पाळाव्या लागणार; पोलिसांचा इशारा काय?
दरम्यान, आत्तापर्यंत पाच महिलांनी नितीन पाटील याच्या जाचामुळे राजीनामे दिले असून अशा प्रकारे कोणाला आपल्या कामाच्या ठिकाणी त्रास दिला जात असेल तर समोर येऊन तक्रार करावी असं आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Uniform civil code : ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदेंच्या हाती ‘UCC’, व्हीप काढणार
दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेने आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. तर या असिस्टंट ब्रँच मॅनेजरला ठाकरे गटाच्या महिलांनी चोप दिल्याने धुळे शहरातील महिलांकडून त्यांच्या या कारवाईचं स्वागत केलं जात आहे. तर महिलांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT