Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट, 'या' शहरात महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात थंडीची लाट

point

पुणे, नाशिक, संभाजीनगर गारठलं

point

मुंबईला थंडीसाठी वाट पाहावी लागणी

राज्यात थंडीची लाट हळूहळू वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पुण्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील पाच दिवस किमान तापमानात घसरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज, पुण्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदले गेले, त्यामुळे आता पुणेकरांनाही हुडहुडी भरली असून, पुण्यातील तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी झालं आहे. तर मुंबईमध्येही हळूहळू आता तापमानात घट होत असून, थंडीसाठी मात्र अजूनही वाट पाहावी लागणार आहे. 
  

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर

 

सध्या अरबी समुद्रात कोमोरिन क्षेत्राजवळ चक्री वाऱ्याची प्रणाली सुरू असून समुद्रसपाटीपासून 0.9 किमी उंचीवर असलेल्या वाऱ्याच्या स्थितीचा या प्रदेशावर परिणाम होतोय. याशिवाय, केरळजवळील आग्नेय अरबी समुद्रातील वाऱ्याचे नमुनेही हवामानावर परिणाम करत आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट झाली असून, किमान आणि कमाल तापमानात 1 ते 2°C पर्यंत गेल्याची नोंद काही ठिकाणी झाली आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 

  • छत्रपती संभाजीनगर : 15°C

  • कोल्हापूर : 27.4°C

  • महाबळेश्वर : 20.8°C

  • मुंबई : 24°C

  • पुणे : 13.6°C

  • परभणी : 26.8°C

  • मालेगाव : 25.2°C

  • अहमदनगर : 25°C
     

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT