Buldhana: लाडक्या लेकाला नागपूरला सोडलं अन्.., नवरा-बायको अन् मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

buldhana bus accident samruddhi highway gangawane couple daughter death ambegaon pune
buldhana bus accident samruddhi highway gangawane couple daughter death ambegaon pune
social share
google news

स्मिता शिंदे/वसंत मोरे, आंबेगाव (पुणे): बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे समृद्धी महामार्गवर (Samruddhi Express way) खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात (Bus Accident) तब्बल 26 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली. याच अपघातात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांतील नवरा बायको व मुलीचा या अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. याबाबतेच वृत्त समजताच संपूर्ण निरगुडसर गावावर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. (buldhana bus accident samruddhi highway gangawane couple daughter death ambegaon pune)

ADVERTISEMENT

या अपघातात इंग्रजीचे विध्यार्थीप्रिय असलेले प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 वर्ष) त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38 वर्ष) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20 वर्ष) या तिघांचाही अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पहाटे आल्यानंतर गंगावणे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला.

हे ही वाचा >> Buldhana Accident: 26 प्रवाशांचा मृत्यू, ‘त्या’ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी

मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे कार्यरत होते. येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कैलास गंगावणे हे मागील 27 वर्ष ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या वृत्ताने संपूर्ण विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

मुलाला कॉलेजमध्ये सोडलं अन्…

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने निघाले होते. खरं तर गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. आपल्या मुलगा आता आपल्यापासून काही वर्ष तरी दूर असेल. त्यामुळे आपण त्याला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी सर्वांनी जावं अशी त्यांची भावना होती. त्यानुसार, आपल्या लाडक्या लेकाला महाविद्यालयात सोडून गंगावणे कुटुंबीय हे नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. पण त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला.

नागपूरमधील विधी महाविद्यालयात सोडण्यासाठी गेलेले गंगावणे कुटुंबीय

 

ADVERTISEMENT

कैलास गंगावणे यांची मुलगी सई ही देखील अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता व ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. पण कालच्या दुर्दैवी घटनेत तिलाही हकनाक जीव गमवावा लागला.

ADVERTISEMENT

अपघातात मृत्यूमुखी पावलेली सई गंगावणे ही वैद्यकीय शिक्षण घेत होती

 

निरगुडसर गावाने गमावले लाडके शिक्षक

दरम्यान, बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळे यांनी तिघांशीही फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण या तिघांचाही फोन लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी याबाबत अधिक तपास केल्यानंतर त्यांना ही दुर्दैवी बातमी समजली.

हे ही वाचा >> Buldhana: समृद्धी महामार्गावर 26 प्रवाशी जागीच ठार, अपघातानंतर बस जळून खाक

निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघाताबाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांचे मोबाइलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत.

अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांचे अश्रुंचे अक्षरक्ष बांध फुटले. विद्यालयात शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT