जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा, ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज द्या नाहीतर उद्या…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार जाणार नसल्याचे सांगत जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आज वाशीच्या शिवाजी महाराज चौकातून पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, सरकारला जर मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्या असतील तर नोंदी मिळालेल्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र  द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी वाशीच्या शिवाजी महाराज मैदानातून बोलताना सरकारला जर नोंदी सापडल्या असतील तर त्यांच्या सगेसोयऱ्यांसाठीही आजच अध्यादेश द्या असं सांगत आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार जाणार नाही अशा भाषेत त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

ADVERTISEMENT

57 लाख नोंदी सापडल्या

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता सरकारकडे नोंदी सापडल्या असून 57 लाख नोंदी सापडल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत आमच्या जागा राखीव ठेऊन तुम्ही शासकीय भरती करा अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा >> राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात, ‘मुख्यमंत्र्यांनी उपटा-उपटी थांबवून…’

सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या

राज्यातील मराठा समाजाच्या 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी करत त्यासाठी तुम्ही आजच अध्यादेश काढा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

हे वाचलं का?

दोन कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र

एकाच नोंदीवर 5 जणांना प्रमाणपत्र मिळालं तर दोन कोटी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल असं सांगत 54 लाख नोंदींच्या वंशावळी जोडायला काही काळ लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगतिल. त्यामुळे आता ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर त्यांनी अर्ज करणे गरजेच असून ती आपली जबाबदारी असंही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हे ही वाचा >>‘आरक्षण देण्याची सरकारची मानसिकताच नाही’,राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT