नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला शनी-नवनीत राणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये खासदार नवनीत राणा तसंच आमदार रवी राणा हे नागपुरात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लागलेले शनी आहेत. लवकरात लवकर त्यांचं संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमान चालीसा म्हणण्यासाठी नागपूरमध्ये आलो आहोत असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचंही हनुमान चालीसा पठण या ठिकाणी होतं आहे. त्यामुळे नवनीत राणा विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्षही पाहायला मिळू शकतो.

हे वाचलं का?

काय म्हणाल्या आहेत नवनीत राणा?

”मी ३६ दिवसांनी नागपूरमध्ये आले आहे. मात्र मला असं वाटतं आहे की इतक्या दिवसांनी येऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी तसंच मारूतीरायाचं दर्शन घेण्यासाठी जाते आहे. असं असताना विरोध का दर्शवला जातो आहे? माझी इतकीच इच्छा आहे की महाराष्ट्राला लागलेला शनी (उद्धव ठाकरे) लवकरात लवकर दूर व्हावा. आम्ही दिल्लीत जाऊनही हनुमान चालीसा पठण केलं. मात्र तिथे आम्हाला काहीही त्रास झाला नाही. मात्र माझ्या महाराष्ट्रात विनाकारण त्रास दिला जातो आहे. हे सगळं उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून होतं आहे” असाही आरोप नवनीत राणा यांनी केला.

ADVERTISEMENT

ठाकरेंच्या सभेदिवशीच नवनीत राणा करणार महाआरती, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाल्या नवनीत राणा?

राष्ट्रवादीचे लोकही हनुमान चालीसा म्हणणार आहेत असं विचारलं असता नवनीत राणा म्हणाल्या की महाराष्ट्राच्या भल्यासाठी ज्या कुणालाही हनुमान चालीसा म्हणायची असेल त्यांनी ती म्हणावी. आमची फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे महाराष्ट्राला लागलेला शनी दूर होणं. आम्ही सगळं काही देखाव्यासाठी करतो आहोत असं शिवसेना म्हणते आहे माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान आहे किमान देखाव्यासाठी तरी हनुमान चालीसा म्हणा. असंही जोरदार उत्तर नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिलं आहे.

नवनीत राणा या नागपूरच्या प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती तसंच आमदार रवी राणाही आहेत. या आंदोलनाची चांगलीच चर्चा नागपूरमध्ये होते आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षानेही हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा सगळ्यात आता हे सगळं प्रकरण कुठल्या दिशेला जाईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT