Mla Disqualification : “नार्वेकरांचा निर्णय हाच भूकंप असेल”, चव्हाणांचं मोठं विधान
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झाल आहे. गद्दारी करून सत्तांतर करण्यात आलं. जनतेने दिलेल्या मताची प्रतारणा करून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या मतांची विक्री केली गेली.”
ADVERTISEMENT
-स्वाती चिखलीकर, सांगली
ADVERTISEMENT
Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. हा निकाल कुणासाठी धक्का असणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे. महत्त्वाचं म्हणजे नार्वेकरांच्या निर्णयामुळे राजकारणात मोठा हादरा बसू शकतो, असेही म्हटले जात आहे. पण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नार्वेकरांच्या निर्णयाबद्दल सूचक विधान केलं आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, इंडिया आघाडी जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
नार्वेकरांचा निर्णयच धक्का असेल -चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झाल आहे. गद्दारी करून सत्तांतर करण्यात आलं. जनतेने दिलेल्या मताची प्रतारणा करून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या मतांची विक्री केली गेली.”
“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एका पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कायद्याला धरून निर्णय होईल असं नाही. ते राजकीय निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय देतील, हाच पहिला भूकंप असेल”, असे सांगताना चव्हाण म्हणाले, “पक्षांतर बंदी कायदा कुचकामी आहे. कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, हे पहावे लागेल.”
ADVERTISEMENT
इंडियाचा एकच उमेदवार असेल -पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, “मागील निवडणुकीत विरोधी मतांची विभागणी झाल्याचा आम्हाला फटका बसला होता. आत्ता मात्र लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून एकास एक उमेदवार उभे केले जाणार आहेत. वंचितच्या सर्व घटकांनी इंडिया आघाडीत येणे गरजेचे आहे. जागावाटपाचा निर्णय हा बैठकीत घेतला जातो, तो अगोदरच बाहेर जाहीर केला जात नाही. बाहेर विधानं करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत आपली मतं व्यक्त करावी. मात्र ते कधी शिवसेनेकडे जातात तर कधी बाहेर आघाडीबाबत वक्तव्य करतात”, असे म्हणत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
भाजप काँग्रेस फोडण्याच्या तयारीत; पृथ्वीराज चव्हाण काय बोलले?
“स्वतःची कातडी वाचवण्यासाठी काही स्वार्थी नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडून गेले असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनता ही अजूनही आमच्या सोबत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फोडाफोडी केल्यानंतर काँग्रेसमध्येही असा प्रयोग करण्याच्या तयारीत भाजप आहे. भाजपने कोणताही मुद्दा पुढे केला तरी त्याचा आता काही उपयोग होणार नाही. महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी हेच मुद्दे निवडणुकीच्या साठी महत्त्वाचे ठरणार आहेत”, पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT