पुण्यात तरूणीवर बलात्कार.. अजितदादांच्या पक्षाचा माजी पदाधिकारी मुख्य आरोपी, घटना काय?

मुंबई तक

पीडितेने केलेल्या आरोपानुसार आरोपी कुकडेने पीडितेची ओळख त्याच्या मित्रांशी करून दिली. त्यांनी तिच्या घरी जाणं येणं वाढवलं आणि नंतर तिला लोणावळा, रायगड आणि पानशेतसह विविध ठिकाणी घेऊन जायला लागले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात संतापजनक घटना, भूतानमधील तरूणीवर अत्याचार

point

शिक्षणासाठी पुण्यात राहत होती भूतानमधील तरूणी

point

तरूणीला मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं

Pune News : भूतानमधील एका 27 वर्षीय तरूणीवर पुण्यात लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.  पुण्यातील सात जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) माजी नेते शंतनू कुकडे यांचाही समावेश आहे. 

हे ही वाचा >> करूणा मुंडे आहेत तरी कोण? आतापर्यंत धनंजय मुंडेंना कसं आणलं अडचणीत.. पाहा A टू Z माहिती

भुतानमधील ही महिला 2020 पासून ही तरूणीवर पुण्यात राहते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समर्थ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कुकडे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींमध्ये ऋषिकेश नवले, जालंदर बडाडे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, वकील विपिन बिडकर, सागर रसगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासिन मेनन यांचाही समावेश आहे.

पीडिता सुरुवातीला 2020 मध्ये शिक्षण आणि कामासाठी बौद्धगया इथे आली होती. नंतर ती पुण्यात आली. पुण्यात ती ऋषिकेश नवले यांच्या संपर्कात आली. ऋषिकेशने तिची ओळख शंतनू कुकडेशी करून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुकडेने तिला शिक्षणात मदत करण्याच्या बहाण्याने राहण्याची व्यवस्था आणि आर्थिक मदत केली. त्यामुळे तरूणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे ही वाचा >> खेळणं देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं, अत्याचार करुन चिमुकलीला संपवलं, मैत्रीणीने सगळं सांगितलं

पीडितेने केलेल्या आरोपानुसार आरोपी कुकडेने पीडितेची ओळख त्याच्या मित्रांशी करून दिली. त्यांनी तिच्या घरी जाणं येणं वाढवलं आणि नंतर तिला लोणावळा, रायगड आणि पानशेतसह विविध ठिकाणी घेऊन जायला लागले. इथेच पीडितेसोबत गैरकृत्य करायला सुरूवात केली. या प्रकरणातील आरोपींपैकी एक जण डीजे आहे तर दुसरा व्यवसायाने वकील आहे.

आरोपी कुकडेवर आधीच दोन तरुणींवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला . त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, भूतानी महिलेचा खटला उघडकीस आला. पोलीस उपायुक्त गिल यांनी कुकडे हाच तरूणीवरील अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं आहे. त्यानेच पीडितेला आश्रय देण्यासाठी त्याच्या स्वयंसेवी संस्थेचा वापर केल्याचा आरोप आहे. एकूण नऊ आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा >> धनंजय मुंडेंच्या अडचणी संपेनात, कोर्टाचा दणका, करूणा मुंडेंना...

दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून गरजू मुलींचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp