Pune : पिस्तूल विक्रीसाठी चौघे पुण्यात आले, पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाईल पकडलं, 4 पिस्तूल आणि काडतुसं
Pune Crime News : पिस्तूल व जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अँटी प्रॉपर्टी सेलने अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात पिस्तूल विक्रीसाठी आलेले 4 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं केली कारवाई
Pune Crime News : पुणे आणि गुन्हे हे समीकरण आता मागच्या दिवसांमध्ये तयार झालं आहे. खून, बलात्कार, वाहनांची तोडफोड, कोयत्यांची दहशत अशा अनेक घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित होत आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी एका गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पिस्तूल व जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अँटी प्रॉपर्टी सेलने अटक केली. आरोपींकडून चार पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. कासारवाडी पुलाखाली ही कारवाई करण्यात आली. अजहर रमजान सय्यद याच्यावर दापोडी पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> सौगात-ए-सत्ता, हिंदूत्व सोडलं ते खंडोजी खोपडे...उद्धव ठाकरे शिंदे-भाजपवर तुफान बरसले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार विविध भागात गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या अजहर सय्यद याला मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांच्या नेतृत्वाखाली अटक करण्यात आली. कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळील पुलाखालून आरोपी अझर रमजान सय्यद हा पिस्तूल विकण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हे ही वाचा >> नागूपरमध्ये गुन्हेगारांचा हैदोस, लेकीची छेडछाड करणाऱ्यांना विरोध केला म्हणून बापाला सपासप वार करत संपवलं
पोलीस अधिकारी कोकणे, रासकर व कदम यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी खांडे, लोखंडे, बनकर, कदम, सावंत यांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपी अझर रमजान सय्यद याला दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह घटनास्थळी अटक केली. आरोपी पूर्वीही पिस्तुल विकायचा, असा पोलिसांना संशय आहे. पिस्तूल आणि काडतुसे मध्य प्रदेशातून आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी हे पिस्तूल कुणाला तरी विकण्यासाठी आले होते. पोलीस त्याचा तपास करत आहेत. याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.