'आमच्या टीमला झोपेची गरज...', Ghibli फोटो बनवणाऱ्या कंपनीच्या CEO ने का केली अशी पोस्ट?
Ghibli इमेज स्टुडिओ फीचर व्हायरल झाले आहे. याचा वापर करून, भारतासह जगभरातील लोक Ghibli शैलीत त्यांच्या प्रतिमा तयार करत आहेत. पण आता याबाबत OpenAI चे CEO यांनी एक मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

Chatgpt Ghibli Style Photo Generator: मुंबई: ChatGPT मेकर OpenAI ने गेल्या मागील आठवड्यात बुधवारी 40 इमेज मेकर सादर केले आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा Ghibli स्टुडिओ फीचर व्हायरल झाला. याबद्दल लोकांमध्ये खूप क्रेझ आहे, त्यानंतर चॅटजीपीटीवर प्रॉम्प्ट्सचा अक्षरशः पूर आला आहे. यानंतर, OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन (CEO Sam Altman) यांनी स्वतः लोकांना एक मोठी विनंती केली.
सोशल मीडियाचा कोणताही प्लॅटफॉर्म असो, सध्या Ghibli चे फोटो सर्वत्र शेअर करण्याचा जोरदार ट्रेंड सुरू आहे. सेलिब्रिटी असो किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, प्रत्येकजण स्वतःची Ghibli Image तयार करत आहेत. जे सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
ChatGPT वर बरेच लोक बनवत आहेत Ghibli
जगभरातील बरेच लोक ChatGPT वापरून त्यांच्या Ghibli Image तयार करत आहेत. यानंतर, OpenAI सर्व्हरवरील दबाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. OpenAI च्या सीईओंनी Ghibli फोटो तयार करण्यासाठी घाई करू नये अशी विनंती केली आहे, कारण त्यांच्या मते त्यांच्या टीमला झोपेची देखील गरज आहे.
हे ही वाचा>> Ghibli फोटो तयार करताना कोणता फोटो निवडावा? या टिप्स लक्षात ठेवा अन् 'असे' फोटो निवडा, तरच...
CEO Sam Altman यांची पोस्ट
सॅम ऑल्टमनने X प्लॅटफॉर्मवर (जुने नाव ट्विटर) पोस्ट केलंय की, 'तुम्ही थोडी वाट पाहू शकता का, आमच्या टीममधील सदस्यांनाही झोपण्याची गरज आहे.' सॅम ऑल्टमनच्या या पोस्टवरून तुम्हाला हे फीचर जगभरात किती आणि कसं व्हायरल झालं असेल याची कल्पना येईल.
असा तयार करा मोफत Ghibli फोटो
Ghibli फोटो ही सेवा ChatGPT Plus सह सुरू करण्यात आली होती आणि आता ही सेवा मोफत देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला संपूर्ण पद्धत सांगणार आहोत.
- यासाठी, ChatGPT वेबसाइट किंवा अॅप उघडा. येथे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये प्लस आयकॉन दिसेल.
- तुम्ही '+' चिन्हावर क्लिक करून फोटो अपलोड करू शकता. यानंतर, यूजर्संना प्रोम्प्ट करावे लागेल.

- एकदा प्रॉम्प्ट बॉक्समध्ये फोटो दिसला की, Ghiblify this लिहा किंवा हा फोटो Studio Ghibli थीममध्ये बदला. अशी कमांड द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हाला काही वेळ वाट पहावी लागेल. त्यानंतर तुम्हाला Ghibli फॉरमॅटमध्ये फोटो दिसेल, जो तुम्ही डाउनलोड करू शकता.

- हा फोटो डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही तो सोशल मीडियावर किंवा प्रोफाइल फोटो म्हणून वापरू शकता.
- जेव्हा आम्ही हे फिचर्स वापरले, तेव्हा एक फोटो तयार केल्यानंतर प्लस आयकॉन 24 तासांसाठी बंद करण्यात आला आणि प्लस सबस्क्रिप्शन घेण्यास सांगितले.
हे ही वाचा>> Ghibli फोटो नेमका कसा तयार करायचा? सोप्पंय खूप.. 'या' Tips लक्षात ठेवा अन् 1 मिनिटात...
अनेक चित्रपट झालेले लोकप्रिय
येथे आम्ही तुम्हाला Ghibli म्हणजे काय ते सांगतो, खरं तर, 1985 मध्ये, स्टुडिओ Ghibli च्या हँड-ऑन अॅनिमेशन आणि त्यांच्या कथांनी लाखो लोकांची मने जिंकली होती. यामुळे, माय नेबर टोटोरो, स्पिरिटेड अवे आणि प्रिन्सेस मोनोनोके सारखे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. OpenAI च्या Ghibli इमेज स्टुडिओ शैलीतील 40 इमेज जनरेशन अचानक व्हायरल होण्याचे हे देखील एक कारण आहे.