Pune Bus Fire : चालती बस पेटली, सिमेंट ब्लॉकला धडकली, 4 जणांचा होरपळून मृत्यू, भयावह दृश्य समोर
आगीत होरपळल्यानं चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चालकाची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. तर प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चालत्या बसला आग, ड्रायव्हरने मारले उडी

बस सिमेंट ब्लॉकवर जाऊन धडकली

बसमधील 4 जणांचा अक्षरश: होरपळून मृत्यू
Pune : पुण्यातील हिंजवडीमध्ये आज सकाळी एका अत्यंत भयंकर असा प्रकार घडला आहे. टॅम्पो ट्रॅव्हलर बसला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत सहा जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. होमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलहून रेझवानच्या दिशेनं जात होती. बसच्या समोरच्या भागाला अचानक आग लागली. त्यामुळे चालकाला बाहेर उडी मारावी लागली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. बसमध्ये एकूण 15 जण होते.
हे ही वाचा >> Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्याची मित्रांकडूनच हत्या, दोन विहिरींमध्ये कापून फेकले मृतदेहाचे तुकडे, प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथे होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. तमन्ना सर्कलकडून रिझवानच्या दिशेनं जाणाऱ्या बसला अचानक समोरून आग लागली. चालकाच्या पायाला आगीच्या झळा लागल्यानंतर चालकानं पटकन गाडीतून खाली उडी मारली. त्यानंतर बसचा वेग कमी झाला आणि काही अंतर पुढे जाऊन ती सिमेंटच्या ब्लॉकला धडकली.
काही सेकंदांमध्ये बसची आग वेगानं वाढली. आग लागल्याचं कळताच काही लोकांनी बसच्या बाहेर उड्या घेतल्या. मात्र, पाठीमागे बसलेल्या चौघांना बाहेर पडता आलं नाही. तसंच आपत्कालीन दरवाजाही उघडू शकला नाही.
हे ही वाचा >> Palghar Crime: उत्कलाचं शीर छाटलं अन्... अखेर 'तो' जाळ्यात अडकलाच!
दरम्यान, आगीत होरपळ्यानं चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चालकाची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. तर प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.