Pune: पत्नीच्या गुप्तांगावर हळद-कुंकू लावलं, लिंबू पिळलं अन्... पतीचं भयंकर कृत्य
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत अत्यंत अमानवीय कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड: पिंपरी- चिंचवडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका 36 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पतीनेच कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेतील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पतीने पत्नीच्या गुप्तांगावर हळदी आणि कुंकू टाकून आणि नंतर त्यावर लिंबू पिळून जादूटोण्याचा प्रयत्न केल्याच आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 11 महिन्यांपूर्वीची आहे.
नेमकं प्रकरण काय?
पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागातून जादूटोण्याचा एक प्रकार समोर आला आहे. याचसंबंधी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे या प्रकरणी माहिती देताना सांगितलं की, 'पिंपरी-चिंचवडमधल्या सांगवी पोलीस स्टेशनमध्ये एका मध्यमवयीन महिलेने तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा सुद्धा दाखल केल् आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या गोष्टी महिला आणि आरोपी हे एकमेकांचे पती-पत्नी होते आणि जवळपास वीस वर्षापासून यांचे लग्नसंबंध आहेत. मागच्या दोन वर्षांपासून ते विभक्त राहत आहेत आणि त्यांचा एक न्यायालयात प्रलंबित आहे कौटुंबिक हिंसाचाराचा.'
हे ही वाचा>> पळून गेलेल्या सासू आणि जावयाचे वय आले समोर; आरोपीला तरुणाला संपत्तीमधून बेदखल करण्याचा घरच्यांचा निर्णय
'त्या अनुषंगाने पती आणि पत्नी हे विभक्त राहत असताना सहा महिन्यापूर्वी महिला ही पतीच्या घरामध्ये मुलांचे शाळेचे दप्तर वगैरे असं सामान आणायला गेली होती. त्यावेळेस महिलेने असा आरोप केलेला आहे की, पतीने तिला घरात घेऊन दरवाजा बंद करून तिला कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतर लिंबू हे तिच्या गुप्तांगावर पिळून तिला धमकी दिली. त्यानुसार 376 ब आणि भादवि कलम 504 506 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.'
'मात्र ही घटना जी आहे ती बऱ्यापैकी जुनी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी देखील आहे आणि पीडित आणि आरोपी त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल चालू आहे त्याच्यामध्ये सुनावणी चालू आहे. त्या अनुषंगाने सविस्तर तपास करून आणि एका निष्कर्षाला पोहोचूनच पुढील कारवाई करणार आहोत.'
'हा जो आरोपी आहे त्याच्या भावाची एक गाडी जाळल्याची घटना मे 2024 मध्ये शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती. त्याच्या ही पीडिता देखील आरोपी आहे.ज्यामध्ये पीडितेविरोधात पुरावेही निष्पन्न झालेले आहेत.'
हे ही वाचा>> सौरभ, साहिल की तिसराच कोणी? पतीचा मृतदेह ड्रममध्ये भरणारी मुस्कान गर्भवती; सासरच्यांनी काय सांगितलं?
'एकंदरीत महिला आणि त्यांचे विवाहसंबंधातील वाद आणि त्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे.'
'तपासामध्ये पुरावे मिळवणं हे महत्त्वाचं काम आहे. महिलेच्या तक्रारी प्रमाणे या प्राधान्याने कुठलीही तक्रार आल्यावर त्याची दखल घेणे आवश्यक आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
'आता याप्रकरणी अटक करण्या इतके पुरावे असतील तर निश्चितपणे अटक केली जाईल.' अशी माहिती पोलीस सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणी दिली आहे.
दरम्यान, या सगळ्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी आता कारवाई देखील सुरू केली आहे.