'या' मुलीला 1000 दिवसांपासून सुरू आहेत Periods, तब्बल 3 वर्षांनंतर...
महिलांसाठी महिन्यातील 4 ते 7 दिवस हे मासिक पाळीचे असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिला लगातार 1000 दिवसांपासून मासिक माळी होतेय. काय आहे नेमका आजार? जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

1000 दिवसांपासून सुरू आहे मासिक पाळी

व्हिडीओमधून मुलीने सांगितली सततच्या ब्लीडिंगची समस्या

पॉपीची ब्लीडिंगला नेमका कोणता आजार कारणीभूत?
मुंबई: मासिक पाळी हे महिलांसाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. सामान्यत: महिलांसाठी महिन्यातील 4 ते 7 दिवस हे मासिक पाळीचे असतात. परंतु, अशा देखील काही महिला आहेत ज्यांची मासिक पाळी ही अधिक काळापर्यंत असते. खरंतर, सध्याची बदलती जीवनशैली, ताणतणाव, आरोग्यासंबंधी विविध समस्या किंवा होर्मोन्समधील असंतुलन हे अनियमित मासिक पाळीचे कारणीभूत ठरतात. परंतु,आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत, की ज्या मुलीला तब्बल 1000 दिवसांपासून मासिक पाळी येतेयं. हे ऐकून अनेकांना धक्का बसला असेल, मात्र ही बातमी खरी आहे. या मुलीचं नाव पॉपी असं असून तिने व्हिडीओ शेअर करुन तिच्या गंभीर समस्येबद्दल सांगितलं आहे.
डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित
न्यूयॉर्क पोस्टनुसार, या मुलीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, "यावेळी एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. परंतु, मला ब्लीडिंग का होतंय? हे कोणीच सांगू शकत नाहीये. माझ्यातील लोहाची पातळी खूप कमी झाली आहे. मी सर्व चाचण्या केल्या, सांगितल्याप्रमाणे सगळे उपचार केले, त्यांनी दिलेले सर्व औषध घेतले, पण ब्लीडिंग थांबत नाही. माझं संपूर्ण शरीर दुखतंय, हाडांमध्ये वेदना होतायेत. मला सतत डोकेदुखी असते आणि मळमळ होते."
पॉपीच्या या गंभीर समस्येमुळे डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनासुद्धा नेमकं या आजाराबद्दल काहीच कळलं नाही.
बऱ्याच टेस्ट्स आणि मेडिकल निरीक्षणातून मुलीला पॉलीसिस्टिक सिंड्रोम (पीसीओएस) असल्याचं समोर आलं आहे. परंतु, डॉक्टरांनी असंसुद्धा म्हटलं आहे की, अंडाशयावर सिस्ट (PCOS) असल्याकारणाने ब्लीडिंग होत नव्हती.
हे ही वाचा: काय सांगता! 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 नव्हे, 500 रुपये मिळणार, यादीत तुमचं नाव आहे का?
3 वर्षांपूर्वी झाली सुरूवात
3 वर्षांपूर्वी पॉपीच्या मासिक पाळीला सुरूवात झाली होती. त्यावेळी, दोन आठवडे सतत ब्लीडिंग होत असल्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरांनी तिला एक आठवडा वाट पाहण्याचा सल्ला दिला. इतक्या काळानंतरही, ब्लीडिंग न थांबल्यामुळे डॉक्टरांनी तिला रक्तस्त्राव थांबण्याचे औषध दिले. दोन आठवड्यांनंतर, ती पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली, त्या डॉक्टराने सुद्धा बरीच औषधे लिहून दिली होती. तसेच, तिला डॉक्टरांकडून ट्रान्सव्हेजिनल अल्ट्रासाउंडच्या साहाय्याने बऱ्याच टेस्ट्स करण्यास सांगितल्या.
त्यानंतर, डॉक्टरांच्या मते, पॉपीच्या अंडाशयावर सिस्ट असल्याने ते तिच्या ब्लीडिंगला कारणीभूत असू शकते. असं म्हटलेलं
रिपोर्ट्समध्ये काय आलं समोर?
न्यूयॉर्क पोस्टनुसार, पॉपीची हिस्टेरोस्कोपी करण्यात आली आणि त्यानंतर तिला एका तज्ज्ञाकडे पाठवण्यात आले आणि तिला दुसरे औषध दिले. ब्लीडिंग कशामुळे होत आहे हे पाहण्यासाठी तिच्या शरीरात एक उपकरण घातले. तरीही काहीही हाती लागले नाही.
यानंतर, एका नेटकऱ्याने तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आणि म्हटले की तिच्या गर्भाशयाचा आकार हृदयाच्या आकाराचा असू शकतो. त्यामुळे तिला 3 वर्षांपासून ब्लीडिंग होत आहे. जेव्हा पॉपीची टेस्ट करण्यात आली तेव्हा तिला बायकोर्न्युएट गर्भाशय नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे समोर आले. हा एक असा आजार आहे, ज्यात दोन कक्षांमध्ये विभागलेल्या गर्भाशयासह महिला जन्म घेतात.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, बायकोर्न्युएट गर्भाशय हे गर्भाशयाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे परंतु तरीही ते दुर्मिळ मानले जाते. 5 टक्क्यांपेक्षा कमी महिलांमध्ये या प्रकारचे गर्भाशय असते.
बहुतेक वेळा अशा परिस्थितीत गर्भाशय हृदयाच्या आकाराचे आहे, हे कळूच शकत नाही कारण त्याची कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच अनेक महिलांना हे माहित नसते की त्यांचे गर्भाशय अशा आकाराचे आहे. आता पॉपी डॉक्टरांना भेटून शस्त्रक्रिया करण्याचा विचार करत आहे याचा कदाचित तिला फायदा होऊ शकेल. वारंवार गर्भपात होणे, जास्त ब्लीडिंग होणे, वेदनादायक मासिक पाळी येणे, डिस्पेरेनिया आणि पॅल्विक वेदना होणे, ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
हे ही वाचा: 5 मुलांच्या आईचं 25 वर्षीय तरुणासोबत जडलं प्रेम! प्रेमकहाणीचा झाला सर्वात धक्कादायक शेवट, काय घडलं?
यावरील उपचार नेमका काय?
'मेट्रोप्लास्टी' या शस्त्रक्रियेद्वारे यावर उपचार करता येतात परंतु ही शस्त्रक्रिया केवळ विशेष परिस्थितीतच केली जाते. ही शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपिक पद्धतीने केली जाऊ शकते. ही एक माइल्ड इनव्हेजिव्ह सर्जरी असल्याकारणाने मोठ्या चीराची आवश्यकता नसते. मेट्रोप्लास्टी केल्यानंतर, महिलांना गर्भधारणेसाठी किमान तीन महिने वाट पहावी लागते.