Pune: पत्नीचे अनैतिक संंबंध असल्याचा संशय, पतीने असं काही केलं की पोलीस गेले चक्रावून!
Pune Crime News: इंदापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे, याच आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. 3 महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपी पतीसह दोघांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

इंदापूरमध्ये धक्कादायक प्रकरण

पतीनेच केला होता पत्नीचा खून

3 महिन्यांनंतर झाला प्रकरणाचा उलगडा
Pune Crime News : पुणे जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये हादरवून सोडणारी गुन्हेगारीची प्रकरणं समोर आली आहेत. अशातच इंदापूरमध्येही अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर सगळेच हादरलेत. कारण ज्या व्यक्तीने मृत महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती, तोच या प्रकरणात आरोपी निघाला आहे. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, मृत महिलेचा पतीच आहे.
हे ही वाचा >> आईस्क्रीम खाताना कॅफे मालकावर हल्ला, धडाधड गोळ्या घालून संपवलं, तपासातून उघड झालं धक्कादायक प्रकरण
इंदापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, याच आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. 3 महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपी पतीसह दोघांना अटक केली आहे.
पत्नीची हत्या करुन, मृतदेह नाशिकमध्ये दरीत फेकला
पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली होती. त्यानंतर पत्नीचा मृतदेह सुमारे 300 किमी लांब असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या डोंगरात 150 फूट दरीत फेकून दिला होता. तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना असं आढळून आलं की, पत्नीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणारा पतीच या प्रकरणात आरोपी आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी महिलेचा पती ज्योतिराम आबा करे (रा. काळशी, तालुका इंदापूर) आणि त्याचा मित्र दत्तात्रेय शिवाजी गोलांडे (रा. गोलंडेवस्ती, इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
हे ही वाचा >> रिक्षा चालकाची मुलगी ते महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला IAS,अदिबा अहमदची मार्कलिस्ट पाहिली का?
हत्या केल्यानंतर पत्नी बेपत्ता झाल्याची दिली तक्रार
या प्रकरणातील मृत महिला, इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी प्रियंका शिवाजी चितळकर यांचं 2013 मध्ये काळशी येथील ज्योतिराम करे यांच्याशी लग्न झालं होते. त्यांना दोन मुलंही आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पती ज्योतिराम याला त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. सततच्या वाद यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला होता. दरम्यान, 29 जानेवारी 2025 ला ज्योतिराम करे याने इंदापूर पोलीस ठाण्यात त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या विवाहित महिलेचा शोध घेत असताना, प्रियंका फक्त बेपत्ताच नाही तर तिचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी तक्रारदार पतीवरच ठेवलं लक्ष
तपास सुरू असताना पोलिसांचं तक्रारदार असलेला पती ज्योतिरामवर लक्ष होतं. ज्योतिरामवर संशय वाढताच पोलिसांनी त्यांची उलटतपासणी केली. त्यावेळी त्यानं कबूल केलं की, त्याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिचा खून केला. ज्योतिरामने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. ज्योतिरामने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.