Pune: 'आम्हीच इथले भाई...' हॉर्न वाजवला म्हणून भाऊ-बहिणीसोबत... 'त्या' घटनेने पुणेकर हादरले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना ब्रेक नाहीच

भवानी पेठेत भाऊ-बहिणीला बेदम मारहाण

'आम्हीच इथले भाई' म्हणत दिल्या धमक्या
Pune Crime News : हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ वादातून टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला. पुण्यातील भवानी पेठेत ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्या 5 ते 6 साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव
रविवारी (दि. 27 एप्रिल 2025) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील गुरुनानकनगर येथील जीवन ज्योती सोसायटीत ही घटना घडली. करण ललित केसवाणी (वय 28) यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शोएब उमर सय्यद (वय 29, रा. कासेवाडी) याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण यांचा भाऊ हर्ष केसवाणी रविवारी दुचाकीवरून गुरुनानकनगरमधून जात होता. त्यावेळी त्याने हॉर्न वाजवला. यावरुन शोएब सय्यद याने हर्षशी वाद घालत त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. हर्षचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत जाब विचारण्यासाठी हर्ष, त्याची बहीण निकिता केसवाणी आणि आजोबा भारत केसवाणी शोएबकडे गेले. त्यावेळी शोएब आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावरही हल्ला केला.
“इथले आम्हीच भाई”
शोएबने “हमको पुछनेवाला तु कौन है, इधर के हम सब भाई है, तेरे भाई को जान से मार डालता,” अशी धमकी देत हर्षच्या डोक्यात दगड घातला. यामुळे हर्षच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतरही मारहाण सुरूच होती. शोएबच्या साथीदारांनी करण आणि निकितावरही दगडफेक केली. ज्यामुळे निकिताच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. इतकंच नाही, तर शोएबने भारत केसवाणी यांना शिवीगाळ करत त्यांचं घर जाळण्याची धमकी दिली.
हे ही वाचा >> Pahalgam Terror Attack: "माझा मुलगा हे करू शकत नाही..." दहशतवाद्याच्या आईने केला मोठा खुलासा
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी शोएब सय्यद याला तात्काळ अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या हल्ल्यात करण केसवाणी, हर्ष केसवाणी आणि निकिता केसवाणी जखमी झाले आहेत. हर्षच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी पुढील अनुषंगाने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.