Maharashtra Weather : मराठवाड्यात विजांचा कडकडाट! 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी, जाणून घ्या आजचं हवामान
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून वातावरण उष्ण होत आहे. मात्र, आज (19 मार्च) मात्र, संपूर्ण राज्यात तापमानचा पारा काहीसा घसरेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

या राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार

जाणून घ्या आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून वातावरण उष्ण होत आहे. मात्र, आज (19 मार्च) मात्र, संपूर्ण राज्यात तापमानचा पारा काहीसा घसरेल. एवढंच नव्हे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात फरक पाहायला मिळेल. दरम्यान, काही जिल्ह्यात वादळी वाऱ्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाचा लपंडावच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कधी उकाडा वाढतो, तर कधी उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती निर्माण होते. परंतु, मागील दोन दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाच वर्तवण्यात आला होता. अशातच आजही प्रादेशिक हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.
हे ही वाचा >> CBSE Education: राज्यातील सर्व शाळांना CBSE अभ्यासक्रम अनिवार्य?, दादा भुसेंची मोठी घोषणा
कोणत्या जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान?
प्रादेशिक हवामान विभागाने ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी ३०-४० किमी वेगाने विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज 21 मार्च 2025 रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोल्यात कोरंड हवामान असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> शरीरातील Uric Acid झटपट होईल कमी, फक्त 'या' काळ्या बियांचं पाणी प्यायला अजिबात विसरू नका!
तर परभणी, हिंगोली येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसच नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये विजांचा कडकडाट, पावसाच्या हलक्या सरी आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.