LSG vs PBKS : 3 सामन्यात फक्त 17 धावा... 27 कोटींचा ऋषभ पंत पुन्हा ठरला फ्लॉप

मुंबई तक

LSG vs PBKS: लखनऊने या मोसमाची सुरुवात दिल्ली कॅपिटल्ससोबत झालेल्या सामन्याने केली. ऋषभ पंतला पहिल्या सामन्यात खातंही उघडता आलं नव्हतं. तो कुलदीप यादवचा शिकार झाला होता. दुसऱ्या सामन्यातही पंतला फक्त 15 धावा करता आल्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंतच्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा

point

लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत 2 धावा करून बाद

point

सर्वात महागडा खेळाडू ऋषभ ठरतोय सर्वात फ्लॉप

IPL 2025 मध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना झाला. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आणि लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने मात्र चाहत्यांना आणि संघालाही निराश केलं. कारण ऋषभ पंतने अवघ्या 2 धावा करुन करून बाद झाला.

खेळाडू महागडा आणि पण कामगिरी...

ऋषभ पंतला लखनऊ संघाने 27 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन आपल्या संघात घेतलंय. पण पंतच्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा केली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये पंतने फक्त 17 धावा आल्या आहेत.

हे ही वाचा >> Beed : कोयत्यानं तरूणावर सपासप वार, उपचारादरम्यान जीव सोडला, मृत्यूआधी आईला म्हणाला आपली जात...

लखनऊने या मोसमाची सुरुवात दिल्ली कॅपिटल्ससोबत झालेल्या सामन्याने केली. ऋषभ पंतला पहिल्या सामन्यात खातंही उघडता आलं नव्हतं. तो कुलदीप यादवचा शिकार झाला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यातही पंतला फक्त 15 धावा करता आल्या. हर्षल पटेलने त्याला बाद केलं होतं. तर तिसऱ्या सामन्यात जेव्हा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता, तेव्हा पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, पंत 2 धावा करून मॅक्सवेलचा बळी ठरला. लखनऊने पॉवरप्लेमध्येच दोन विकेट गमावल्या असतानाच त्याने आपली विकेट गमावली.

पंजाबने नाणेफेक जिंकली

या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाब संघाने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकी फर्ग्युसनने पंजाब संघात प्रवेश केला. तर लखनऊमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला.

हे ही वाचा >> उज्ज्वल आणि नीलू Xhams$#*, Strip$@% ला देशी पॉर्न विकून 'एवढे' पैसे कमवायचे, 'इथे' करायचे शूटिंग

सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आणि दुसरा सर्वात महागडा खेळाडू श्रेयस अय्यर यांच्यातला हा सामना ऐतिहासिक सामना आहे. ऋषभ पंतला एलएसजीने आयपीएल 2025 मेगा लिलावात 27 कोटी रुपयांना खरेदी केलं, तर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॉन्सन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई.

हे वाचलं का?

    follow whatsapp