Dombivli MIDC Fire News : डोंबिवलीत पुन्हा एका कंपनीत अग्नितांडव! शाळेजवळ असलेल्या कारखान्याला आग
Dombivli news : कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याच्या घटनेला महिना होत नाही, तोच आणखी एका कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
डोंबिवलीमध्ये एका कंपनीला भीषण आग
अनेक कामगार कंपनीत अडकल्याची भीती
आगी विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न
Dombivli fire : डोंबिवली शहर पुन्हा एकदा आगीच्या घटनेने हादरले आहे. एमआयडीसीतील फेज २ मध्ये असलेल्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अभिनव शाळेवर असलेल्या कंपनीत आधी आग लागली आणि त्यानंतर स्फोटाचे आवाज आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Fire broke out in a Factory at Dombivli MIDC)
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआडीसीतील अमुदान कंपनीत भयंकर आग लागली होती. ती घटना विस्मृतीत जाण्याआधीच आता आणखी एक अशीच घटना घडली आहे. डोंबिवलीतील अमुदान कंपनीपासून जवळ असलेल्या आणखी एका कंपनीला भीषण आग लागली.
हेही वाचा >> सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
सकाळी ही घटना घडली असून, कंपनीत काही कामगार अडकले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, आगीनंतर भीषण स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
हे वाचलं का?
धुराचे लोळ, स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या कंपनीत रासायनिक प्रक्रिया केली जाते, अशी प्राथमिक माहिती आहे. इंडो अमाईन्स असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीजवळ अभिनव शाळाही आहे. आग लागल्यानंतर शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी 'एवढ्या' जागा जिंकतील? यादीच पाहा!
आगीने काही क्षणात रुद्रावतार धारण केल्याने संपूर्ण कंपनीच भक्ष्यस्थानी सापडली. आगीमुळे धुराचे प्रचंड लोळ दिसत होते. त्याचबरोबर कंपनीत स्फोट होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT