Gold Rate: एका झटक्यात सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, अर्थमंत्र्यांची फक्त 'ती' घोषणा अन्...

रोहित गोळे

ADVERTISEMENT

सोन्याच्या दरात मोठी घसरण
सोन्याच्या दरात मोठी घसरण
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात मोठी घसरण

point

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा

point

सोनं थेट 4000 रुपयांनी झालं स्वस्त

Gold Rate Fall after Budget 2024: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला असून त्यात सोन्या-चांदीबाबत (Gold-Silver) मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानंतर सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण (Gold Rate Fall)दिसून आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्प संपताच सोन्याचा दर हा थेट प्रति 10 ग्रॅम सुमारे 4000 रुपयांनी कमी झाला. (budget 2024 gold rate one announcement in budget and suddenly gold became cheaper by rs 4000 know the latest rate)

सोन्याची किंमत किती रुपयांनी झाली कमी?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सोने (Gold) आणि चांदीसह (Silver) इतर धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली. सरकारने आता सोने आणि चांदीवर आधीपासून लागू असलेली कस्टम ड्यूटी 6% पर्यंत कमी केली आहे. या निर्णयाचा तात्काळ परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसू लागला असून सोनं हे 4 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

हे ही वाचा>> Budget 2024: पहिली नोकरी लागताच मोदी सरकार देणार 15000, पण...

दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंग दरम्यान, मंगळवारी तो 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता आणि सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्याची घोषणा होताच, दरात वेगाने घसरण सुरू झाली आणि सोनं 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढ्या किंमतीपर्यंत खाली आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानुसार अवघ्या काही तासांत सोन्याचा भाव (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 4,350 रुपयांनी कमी झाला. याआधी सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 72,718 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीमध्येही मोठी घसरण

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव कमी झाले, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही काही क्षणात मोठी घट झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर चांदीची किंमत (Silver Price) 89,015 रुपयांवर पोहोचली होती. पण आता त्यात अचानक मोठी घसरण सुरू झाली आणि सोन्याप्रमाणे हा मौल्यवान धातूही 4,740 रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत सध्या 84,275 रुपये प्रति किलो एवढी झाली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Budget 2024: काय स्वस्त, काय महाग... मोदी सरकारने बजेटमधून नेमकं दिलं तरी काय?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेमकी काय केली घोषणा?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी 10 टक्क्यांवरून 6 टक्के केली आहे. यामध्ये बेसिक कस्टम ड्यूटी 5 टक्के, ॲग्री इन्फ्रा आणि डेव्हलपमेंट सेस 1 टक्के आहे. याशिवाय प्लॅटिनमवरील शुल्क आता 6.4 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय  अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आयात केलेल्या दागिन्यांवरील कस्टम ड्यूटीही कमी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

वास्तविक, सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6% पर्यंत कमी केले आहे, ज्यामुळे देशांतर्गत किंमती देखील कमी होऊ शकतात आणि सोन्याची मागणी वाढू शकते. सोने आणि चांदीवरील सध्याचे शुल्क 15% आहे, ज्यामध्ये 10% मूलभूत कस्टम ड्यूटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर समाविष्ट आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता मूळ कस्टम ड्युटी 5 टक्के, तर उपकर 1 टक्के असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT