Kurla Accident Today : लेकीचा फोन आला, रिक्षा मिळत नाही म्हणाली अन् नंतर थेट मृतदेह... बापानं जड अंतकरणानं सांगितली आपबीती

मुंबई तक

Kurla Bus Accident Story: बस अपघाताच्या घटनेनं कुर्ला आणि मुंबईतील परिसर अक्षरश: हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकसी सुरू आहे. मृतांमध्ये आफरिन हीचा सुद्धा समावेश आहे. तिच्या वडिलांनी 'मुंबई तक'शी बोलताना घडलेला प्रकार सांगितलं. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुर्ला बस अपघातातली हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

point

बापानं सांगितल्या लेकीच्या नोकरीच्या पहिल्या दिवशीची आठवण

Kurla Bus Accident Afrin Shah : मला माझ्या लेकीचा फोन आला, म्हणाली पप्पा मला रिक्षा मिळत नाहीये, तेव्हा मी तिला म्हणालो पायी ये. त्यानंतर पुढचा एक फोन थेट रुग्णालयातूनच आला.... ही आपबीती सांगितली आहे कुर्ला बस अपघातात मृत्यू झालेल्या एका मुलीच्या व़डिलांनी. काल रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या या घटनेनं कुर्ला आणि मुंबईतील परिसर अक्षरश: हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकसी सुरू आहे. मृतांमध्ये आफरिन हीचा सुद्धा समावेश आहे. तिच्या वडिलांनी 'मुंबई तक'शी बोलताना घडलेला प्रकार सांगितलं. 

हे ही वाचा >> Mumbai Kurla BEST Bus Accident : अपघातग्रस्त BEST बस चालक 9 दिवसाआधीच नोकरीला लागला? तपासात धक्कादाय माहिती उघड

अब्दुल सलीम यांनी सांगितलं की, माझी मुलगी आफरिन कामावरुन घरी परतत होती. कुर्ला स्टेशनवर आल्यावर तिने 9 वाजता मला फोन केला. त्यानंतर थेट 9 वाजून 54 मिनिटांना मला कुर्ला बाबा रुग्णालयातून फोन आला की, तुमच्या मुलीचा मोबाईल मिळाला आहे... मी लगेचच तिथे पोहोचलो तर माझ्या मुलीचा मृतदेह पडलेला होता. पुढे ते म्हणाले की, माझ्या मुलीचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. माझ्यासोबत जे घडलं ते कुणासोबतही घडू नये, कोणत्याच वडिलांच्या वाट्याला हे दु:ख येऊ नये. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती पावलं उचलली पाहिजे. मेट्रोचं काम सुरू आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, बस डेपो आहे, स्काय वॉक नाही, महापालिकेला हत्पे देऊन रस्त्यावर ठेले लावले जातात असा आरोप या मुलीच्या वडिलांनी केला आहे. 
 

हे ही वाचा >> Inside Story: खळबळजनक! भाजप आमदाराच्या मामाचा मृतदेहच सापडला, कोणी केली हत्या?

कुर्ला परिसरातील एलबीएस रोडवर काल रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातानं मुंबई अक्षरश: हादरली आहे. कुणी कुटुंबासोबत खरेदीसाठी आलं होतं, तर कुणी मुलांसाठी खाऊ तर कुणी भाजी विकत घेऊन जात होतं. अशातच बेस्टची एक बस भरधाव वेगात आली, मार्केटमध्ये घुसली आणि 30 पेक्षा जास्त लोकांना चिरडलं. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली असून, स्थानिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp