Chandrayaan 3 : जे कुणाला जमलं नाही ते भारताने केलं, चंद्राचे ‘ते’ दुर्मिळ फोटो ISRO ने केले ट्वीट!
चंद्राच्या दूरच्या बाजूचे म्हणजेच पृथ्वीकडे कधीही न दिसणार्या भागांचे फोटो इस्त्रोकडून (ISRO) जारी करण्यात आले आहेत. इस्रोने ट्विट करून चंद्राच्या त्या भागांचे फोटो शेअर केले आहेत, जे आपण उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू शकत नाही. आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर पोहोचू शकला नाही.
ADVERTISEMENT
ISRO : Chandrayaan 3 : चंद्राच्या दूरच्या बाजूचे म्हणजेच पृथ्वीकडे कधीही न दिसणार्या भागांचे फोटो इस्त्रोकडून (ISRO) जारी करण्यात आले आहेत. इस्रोने ट्विट करून चंद्राच्या त्या भागांचे फोटो शेअर केले आहेत, जे आपण उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू शकत नाही. आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर पोहोचू शकला नाही. चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मिशनचे लँडर मॉड्यूल आता चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 ते 150 किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा घालत आहे. (Chandrayaan 3 rare photo of the moon is tweeted by ISRO)
ADVERTISEMENT
हे फोटो चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरमध्ये बसवण्यात आलेल्या लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्यातून (LHDAC) टिपण्यात आले आहेत. या चार फोटोंमध्ये चंद्रावरील वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे दिसत आहेत. काही खड्डे अतिशय भयानक, खडबडीत आहेत. तर कुठेतरी लांबलचक मैदानासारखी जागा आहे.
Dilip Walse Patil : शरद पवारांबद्दल वळसे-पाटील असं बोलले, कारण…; वाचा खुलासा
LHDAC कॅमेरा विशेषत:, चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे कसा उतरवता येईल या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. अहमदाबादच्या इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने (SAC) हे तयार केले आहे. या कॅमेर्यासह इतर काही पेलोड देखील एकत्र काम करतील.
हे वाचलं का?
ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चे दुसरे आणि शेवटचे डिबूस्टिंग मॅन्युव्हर यशस्वीरित्या केले गेले आहे. आता केवळ 23 ऑगस्टची प्रतीक्षा आहे, जेव्हा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचेल. अमेरिका, चीन आणि रशियासह भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरणार आहे.
विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ‘ही’ उपकरणं करणार मदत!
लँडिंग दरम्यान LHDAC ला मदत करणारे पेलोड्स म्हणजे लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC), लेझर अल्टिमीटर (LASA), लेझर डॉप्लर व्हेलॉसिटीमीटर (LDV) आणि लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) जेणेकरून लँडर सुरक्षित पृष्ठभागावर उतरवता येईल.
ADVERTISEMENT
Dilip Walse Patil : पहिला वार! शरद पवारांची वळसे-पाटलांनी काढली ‘उंची’
विक्रम लँडरची किती वेगाने होणार लँडिंग?
विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, तेव्हा त्याचा वेग सुमारे 2 मीटर प्रति सेकंद असेल. पण हॉरीझॉन्टल वेग प्रति सेकंद 0.5 मीटर असेल. विक्रम लँडर 12 अंश उतारावर उतरू शकतो. ही सर्व उपकरणं विक्रम लँडरला वेग, दिशा आणि सपाट जमीन शोधण्यात मदत करतील. ही सर्व उपकरणं लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 500 मीटर आधीच अॅक्टिव्हेट होतील.
ADVERTISEMENT
Dilip walse Patil : ‘बरे झाले मनातील विष बाहेर पडतेय’, जितेंद्र आव्हाड भडकले
लँडिंगनंतर कोणती उपकरणं करणार काम?
- लँडिंगनंतर विक्रम लँडरमध्ये बसवलेले चार पेलोड काम करतील.
- रंभा (RAMBHA) हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि भिन्नता तपासेल.
- चास्टे (ChaSTE) हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या उष्णतेची म्हणजेच तापमानाची तपासणी करेल.
- इल्सा (ILSA) हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपाच्या गतिविधींची तपासणी करेल.
- लेझर रेट्रोरेफ्लेक्टर अॅरे (LRA) हे चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT