Gold Rate: 'सोन्याचे दर चमकतात कसे... लकालका लकालका'; नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुफान तेजी!
Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदीच्या भावात तुफान तेजी दिसत आहे. आजपासून (03 ऑक्टोबर 2024) नवरात्रीला सुरूवात झाली आहे. अशातच आता सोन्याने उच्चांक गाठला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदीच्या भावात तुफान तेजी
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने गाठला उच्चांक
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदीच्या भावात तुफान तेजी दिसत आहे. आजपासून (03 ऑक्टोबर 2024) नवरात्रीला सुरूवात झाली आहे. अशातच आता सोन्याने उच्चांक गाठला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून येतेय, त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कपाळाला आट्या आल्या आहेत. हे बदल किती रूपयांनी झाले आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver rate hike in navratri 24 carat gold prices today 3 october 2024 in maharashtra mumbai Pune)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (02 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,450 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 110 रूपयांनी वाढला झाली असून याची किंमत 77,560 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये होता. जो 100 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 71,100 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 95,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana: दादांचा वादा! लाडकी बहीण योजनेबबात मोठी घोषणा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे पैसे...
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,100 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,560 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,170 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,100 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,560 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,170 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,100 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,560 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,170 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,130 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,590 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,200 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT