Maharashtra weather: धुरकट हवा, दमट वातावरण; महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट? IMD चा इशारा

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धुरकट हवा आणि दमट वातावरणाची स्थिती निर्माण

point

पावसाने दिली उघडीप

point

ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?

Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला. पण आता पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सगळीकडे धुरकट हवा आणि दमट वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पाहता महाराष्ट्रावर कोणत्या मोठ्या संकटाचं सावट आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसेच आज (2 ऑक्टोबर 2024) राज्यात पावसाची स्थिती कशी असेल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast IMD Alert mumbai pune today 2 october 2024 know weather report)

सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी, आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह नऊ राज्यात आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पावसाने उघडीच देताच दमट वातावरण निर्माण झाले असून ऑक्टोबर हीट वाढली आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi: बॉसशी उडतील खटके! तर 'या' लोकांवर पैशांचा पाऊस! आज तुमच्या राशीत काय?

राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात विजांसह पावसाचा अंदाज असून इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने या परिस्थितीची अंदाज आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ अशा चारही विभागांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT