Oshin Sharma : पूजा खेडकरनंतर ओशिन शर्मा वादात, सरकारकडून उचलबांगडी; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

himachal pradesh lady officer oshin sharma tranfer social media influencer
पूजा खेडकरनंतर ओशिन शर्मा वादात
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकरनंतर ओशिन शर्मा सापडल्या वादात

point

ओशिन शर्मा यांची राज्य सरकारकडून उलचबांगडी

point

सरकारी कामात केलेल्या दिरंगाईमुळे कारवाई

Oshin Sharma HAS : सोशल मीडियाच्या नादापायी सरकारी अधिकाऱ्याच्या नोकऱ्या गेल्याच्या अनेक घडल्या आहेत. अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar). प्रशिक्षणार्थी असून गाडीवर लाल दिवा लावून चमकोगिरीच्या नादात त्या वादात सापडल्या होत्या. पूजा खेडकर प्रकरणानंतर आता अनेक सरकारी अधिकारी रडारवर आले आहे.HAS अधिकारी ओशिन शर्मा (Oshin Sharma) यांची राज्य सरकारकडून उलचबांगडी करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील वाढता वावर आणि सरकारी कामात केलेल्या दिरंगाईमुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर त्यांची कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या आहेत.(himachal pradesh lady officer oshin sharma tranfer social media influencer) 

हिमाचल प्रदेशच्या सोशल मीडिया स्टार आणि प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या ओशिन शर्मा या संधोल येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर धर्मपुरचे उपविभागीय अधिकारी जोगिंदर पटियाल यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता ओशिन शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. तसेच बदलीनंतर त्यांना कोणत्याही ठिकाणी पोस्टींग देण्यात आलेली नाही आहे. याउलट त्यांनी  शिमला येथील प्रशासकीय विभागात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता ओशिन शर्मा यांच्या सरकारी नोकरीवर टांगती तलवार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

हिमाचलमधील 32 वर्षीय महिला अधिकारी ओशिन शर्मा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. ओशिन यांची विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरू प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. एक्सवर ओशिन यांचे 109K, Instagram वर 348K, Facebook वर 296K आणि Oshin Sharma Public Group मध्ये 128K फॉलोअर्स आहेत. ओशिन शर्मा सोशल मीडियावर एवढ्या सक्रिय असल्याने स्थानिक राजकारणी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर नाखूश असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मीडिया रिपोर्टनुसार, मंडीचे विभागीय आयुक्त अपूर्व देवगन यांनी त्याच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यात असे आढळून आले होते की, ओशिन यांच्याकडून प्रशासकीय कामे वेळीत केली जात नाहीत. त्याच्या सर्व सामान्य नागरीकांना फटका बसत होता. त्यानंतर एसडीएमला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या सरकारी कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित असल्याचे देखील आढळून आले होते.

 त्यानंतर ओशिन शर्मा यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर त्यांची कोणत्याही ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नव्हती. तसेच त्यांना HAS मध्ये रिपोर्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ओशिन शर्मा यांनी बदली नेमकी कुठे होणार? किंवा त्यांची सरकारी नोकरी जाणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Aarya Jadhao : ''...तर बिग बॉसमध्ये पुन्हा परतणार'', Insta लाईव्हवर आर्याने निक्कीला भिडण्याचे दिले संकेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT