Irshalwadi Landslide : शोध सुरू, पण आशा मावळल्या! इर्शाळवाडीत काय सुरूये?
इर्शाळवाडीत शोध कार्य सुरू असून, आणखी एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तुही पाठवल्या जात आहेत.
ADVERTISEMENT
Raigad Landslide Latest News : निसर्गाच्या प्रकोपाचा बळी ठरलेल्या इर्शाळवाडीत अजूनही अनेकजण भल्यामोठ्या चिखलाच्या ढिगाऱ्याखालीच दबलेले आहेत. पायी जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नसलेल्या याठिकाणी जवानांना हातानेच चिखल आणि इतर ढिगारा बाजूला करावा लागत असून, 24 तासांहून अधिक काळ लोटला तरी मोहीम सुरूच आहे. 20 जुलै रोजी बचाव व मदत कार्य थांबवण्यात आलं होतं. 21 जुलै पहाटे परत मदत कार्य हाती घेण्यात आलं असून, जवान दबल्या गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, बरेच तास लोटले असल्याने दरडीखाली दबल्या गेलेले जिवंत असण्याचा आशा मावळू लागल्या आहेत. (Irshalwadi Landslide incident updates : No one expected to remain alive after those trapped under the debros have been there for over 24 hours)
ADVERTISEMENT
19 जुलैच्या रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. मोठंमोठी झाडंही घरांवर उन्मळून पडली. संततधार पावसात आव्हानात्मक स्थितीत शोध कार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाचे प्रमुख राहुल कुमार रघुवंश यांनी सांगितलं की, “आम्ही तीन पद्धतीने शोध घेत आहोत. आम्ही श्वानांच्या मदतीने घेत आहोत. दुसरं म्हणजे जवानही शोध कार्यात आहेत. हे ठिकाण खूप अवघड आहे. उंचावर चढून जावं लागतं, पण आम्ही याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. काल (20 जुलै) जेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली तेव्हा पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली.”
ढिगाऱ्याखाली दबलेल्यांच्या शोधासाठी श्वानांची मदत
एनडीआरएफच्या जवान फावडे, टिकाव आणि टोपल्याने दरडीचा ढिगारा बाजूला करत आहे. कारण याठिकाणी कोणतीही मशिनरी पोहोचणं खूप अवघड आहे. आता माती खाली दबलेल्यांना शोधण्यासाठी श्वानांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी काही श्वानही इर्शाळवाडीत आणले गेले आहेत.
हे वाचलं का?
वाचा >> Irshalwadi Landslide : अशी होती इर्शाळवाडी, ड्रोन व्हिडीओ व्हायरल
#WATCH | Raigad, Maharashtra: Canine squad carries out search operation in landslide-hit area. https://t.co/ZLiJm36aZ8 pic.twitter.com/xGHghObJEB
— ANI (@ANI) July 21, 2023
इर्शाळवाडी दरड दुर्घटना : मदतीचे हात सरसावले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची गुरुवारी (20 जुलै) पाहणी केली. त्याचबरोबर वाडीतील नागरिकांना मदत करण्याचे आवानही केले होते. रायगड जिल्ह्यातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी मदत पाठवली आहे. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> Kalyan: नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ बाळाचं नेमकं काय झालं?, 24 तास उलटले तरीही…
20 बाय 10 आकाराचे 4, 40 बाय 10 आकाराचे 2 आणि इतर दोन असे 6 कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी आणि जेएसडब्ल्यू समूहाकडून घटनास्थळावरील बेसकॅम्पला पाठवण्यात आले. चौक, खालापूर येथे तात्पुरती निवारा व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. तीन हजार अन्नाची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घटनास्थळ उंचीवर असल्याने यंत्रसामुग्री पोहोचत नसल्याने मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून 80 अनुभवी कारागिरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले आहे.
ADVERTISEMENT
#इर्शाळगडदुर्घटना
घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी @mybmc ने तातडीने विविध यंत्रसामुग्री पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या होत्या, त्यानुसार तीन बॉब कॅट आणि एक पोकलेन ही संयंत्रे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. pic.twitter.com/sMPepoBiaf— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
ढिगारा हटवण्यासाठी छोटे जेसीबी घटनास्थळी नेणार
इर्शाळवाढीतील शोध मोहिमेला वेग देण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने विविध यंत्रसामुग्री पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. त्यानंतर तीन बॉब कॅट आणि एक पोकलेन ही मशिनरी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत तीन होमगार्डचा मृत्यू
दरम्यान, या दुर्घटनेत तीन सख्खे भाऊ मृत्यूमुखी पडले आहेत. हे तिघेही होमगार्ड होते. ते इर्शाळवाडी गावातील स्थानिक रहिवासी होते.जेव्हा वाडीवर दरड कोसळली त्याचवेळी ते तिघेही आपल्या घरात झोपले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ते सर्व आपत्ती व्यवस्थापन ग्रुप खेड-रत्नागिरी (होमगार्ड जवान) नावाच्या गटाचे देखील एक भाग होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT