Kolhapur Accident : नाईट ड्युटीसाठी निघाला, कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच...; अपघाताचा भयंकर Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

kolhapur accident news horrific car accident video goes viral car driver hit a boy shocking accident story
भरधाव कारने तरूणाला हवेत उडवलं
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरात कार चालकाने तरूणाला हवेत उडवलं

point

तरूणाला भरधाव कारची भीषण धडक

point

अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Kolhapur Hit and Run : मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापूरात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव कारने (car Driver) तरूणाला  (Boy)उडवल्याची घटना घडली आहे. रोहित सखाराम हाप्पे असे या 24 वर्षीय तरूणाचे नाव आहे. रोहित घरातून नाईट ड्युटीसाठी निघाला होता. आणि कंपनीच्या अगदी जवळ पोहोचला असतानाच त्याच्यासोबत ही अपघाताची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video Viral) देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय. (kolhapur accident news horrific car accident video goes viral car driver hit a boy shocking accident story) 

कोल्हापूरच्या उचगाव रोडवर ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेतील अपघातग्रस्त तरूण रोहित हाप्पे हा एका कंपनीत नाईट ड्युटीचं काम करायचा. नेहमीप्रमाणे रोहित हाप्पे 28 ऑगस्टला रात्री 12.20 च्या दरम्यान रस्त्यावरून चालत कंपनीच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान मागून आलेल्या चारचाकी कारने त्याला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रोहित अक्षरश हवेत उडाला होता आणि काही अंतरावर जाऊन जमिनीवर पडला होता.

हे ही वाचा : Tanaji Sawant: अजित पवारांचं नाव घेताच तानाजी सावंतांना उलट्या का होतात? Inside स्टोरी

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रोहित हाप्पेला अपघात झाला,त्या ठिकाणी काही पाऊलांवरच रोहित हाप्पेची कंपनी होती. तो फक्त गेट उघडून आत शिरणारच होता, पण काही मिनिटांच्या या खेळात त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात रोहितच्या डोक्याला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झासी आहे. या घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्याच्यावर सध्या उपचार सूरू आहेत.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या अपघातानंतर ड्रायव्हरने न थांबता थेट पलायन केले आहे. या प्रकरणी आता अज्ञात कार चालकाविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 3000 की 4500 रुपये मिळणार, नेमके किती पैसे तुमच्या खात्यात येणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT