सावधान! घरातून बाहेर पडताय? दोन इमारतींच्या मध्ये विजांचा झाला कडकडाट, वादळाचा खतरनाक Video व्हायरल
Thunderstorms Viral Video : तामिळनाडूत मुसळधारा पावसाने धुमाकूळ घातला असून चेन्नईतही वादळाचा तडाखा बसला आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांचे पावसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आकाशातील सर्वात खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
वादळ आणि विजांचा तडाखा बसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण
वादळाचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का
Thunderstorms Viral Video : तामिळनाडूत मुसळधारा पावसाने धुमाकूळ घातला असून चेन्नईतही वादळाचा तडाखा बसला आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांचे पावसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आकाशात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याया वारा सुटल्याचा एक खतरनाक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. आकाशात विजांचा कडकडाट झाल्याचं सर्वात भयानक दृष्य लोकांनी कॅमेरात कैद केलं आहे. आकाशातील हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
ADVERTISEMENT
दोन इमारतींच्या मध्ये झाला विजांचा कडकडाट
पट्टाबी रमन नावाच्या यूजरने वादळाचा हा भयानक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडीओला रमनने #sholinganallur आणि #chennairains असे हॅशटॅग जोडले आहेत. या व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, विजा चमकल्याने आकाशात गुलाबी रंगाची चादर पसरल्यासारखं वाटत आहे. व्हिडीओतीला वादळ पाहून कुणच्याही अंगावट काटा आल्याशिवाय राहणार नाही. दोन इमारतींच्या मध्ये विजाचां कडकडाट झाल्याचा नजारा किती भीतीदायक आहे, हे या व्हिडीओत दिसत आहे.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: ...तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा
इथे पाहा थरारक व्हिडीओ
वादळ आणि आकाशात विजांचा धुमाकूळ पाहून लोकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. लोकं भयभीत झाल्याच्या प्रतिक्रिया इंटरनेटवर उमटू लागल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, खूप छान कॅप्चर्ड केलं. दुसऱ्या यूजरने म्हटलं, वंडरफूल क्लिक..तर अन्य एका यूजरने म्हटलं, खूप वेळापासून मी असं काही पाहिलं नव्हतं. तुम्ही हे दृष्य खूप सुंदर प्रकारे कॅमेरात कैद केलं आहे. तर काही एआय यूजर्सने हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे. रमनने या यूजर्सला प्रत्युत्तर देत स्पष्ट केलं की, हा व्हिडीओ एआय जनरेटेड नाही.
हे वाचलं का?
या व्हिडीओत कोणत्याही प्रकारची एडिटिंग केली नाही. हे दृष्य खरं आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाचा जोर कायम रहिला तर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदात हवामान विभागाने वर्तवला आहे. तसच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी संबंधीत प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT