Maharashtra Rain : राज्यात उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra rain tommorrow these district school are close ratnagiri thane palghar district red alert imd
उद्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा बंद आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शुक्रवारी मुसळधार पावसांचा अंदाज आहे.

point

अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा

point

'या' जिल्ह्यातील शाळा उद्या राहणार बंद

Maharashtra Rain Alert, School Closed : राज्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पुण्यात तर पावसाने हाहाकार माजवला होता. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई, रायगड, पालघर, ठाणे भागात देखील आज पावसाने दमदार बॅटींग केली आहे. उद्या शुक्रवारी 26  जुलैला देखील असाच मुसळधार पाऊस असणार असून अनेक रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा बंद आहेत? ते जाणून घेऊयात. (maharashtra rain tommorrow these district school are close ratnagiri thane palghar district red alert imd)  

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार  दि. 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत

रायगडसोबत ठाण्यातील ठाण्यातील शाळा, खाजगी अनुदानित, अशतः अनुदानित व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळाना देखील उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्या ही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :Mumbai Rain: मुंबईत पुन्हा 26 जुलै?, पावसाचा LIVE Video पाहून भरेल धडकी!

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील शाळेंना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारा नंतर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्वच माध्यमाच्या मंडळाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर झाली आहे.

हे ही वाचा :Anil Deshmukh : फडणवीसांना देशमुखांचे थेट चॅलेंज, ''माझ्याविरोधातील व्हिडिओ क्लिप्स जगजाहीर कराव्या''

पुण्यात पावसाने अक्षरश धुमाकुळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात उद्या देखील हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळा 26 जुलै रोजी बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. 

ADVERTISEMENT

कोल्हापूरात दोन दिवस सुट्टी 

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

सांगलीत शाळांना सुट्टी

सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  सांगली जिल्ह्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने तसेच वाळवा आणि शिराळा तालुक्यात वारणा नदीला पूर आल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT