Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर; जाणून घ्या पूजा, विधी अन् 'या' महत्त्वाच्या गोष्टी...
Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. या दिवशी गणेशभक्त घरी बाप्पाची मूर्ती आणतात आणि पूर्ण भक्तिभावाने त्याची सेवा करतात.
ADVERTISEMENT
Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. या दिवशी गणेशभक्त घरी बाप्पाची मूर्ती आणतात आणि पूर्ण भक्तिभावाने त्याची सेवा करतात. 10 दिवसांचा गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होईल, जो 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला समाप्त होईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती विसर्जन केले जाते. यामुळे आज आपण पूजा, विधी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. (Ganesh Chaturthi 2024 Rituals to follow on ganesh chaturthi day)
ADVERTISEMENT
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो. असे मानले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश पृथ्वीवर येतात आणि पुढील 10 दिवस आपल्या भक्तांना सेवा आणि भक्ती करण्याची संधी देतात. याशिवाय निघताना भक्तांचे सर्व त्रास ते सोबत घेऊन जातात.
हेही वाचा : lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?
गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठा आणि पूजा-विधी
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न केल्यास इच्छित फळ मिळते असे म्हणतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर, पाटावर लाल रंगाचे कापड पसरवून त्यावर अक्षता ठेवा आणि चंदन किंवा गंधाने स्वस्तिक बनवा. नंतर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करा.
हे वाचलं का?
'या' मंत्रांचा करा जप
बाप्पाची प्रतिष्ठापना करताना 'वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥' या मंत्राचा पाच वेळा जप करावा. आता गणपती बाप्पाला गंगाजलाने स्नान घारा. त्यांना वस्त्र, पवित्र धागा, चंदन, दुर्वा, अक्षता, धूप, दिवा, शमीची पाने, पिवळी फुले, फळे अर्पण करा. त्याचबरोबर पाच, सात किंवा 21 मोदक अर्पण करा. गणपती बाप्पाची आरती करा आणि आपल्या मनातील इच्छा मागून आशीर्वाद घ्या.
गणपती बाप्पाचे विशेष मंत्र
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय । लम्बोदराय सकलाय जगद्विताय।।
नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय । गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
ADVERTISEMENT
अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते।
मषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः॥
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Times Tower Fire: टाइम्स टॉवरला भीषण आग! अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल
बाप्पाला 'या' गोष्टी कधीच करू नये अर्पण
- पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाने चंद्रदेवाला शाप दिला होता. त्यामुळे पांढऱ्या रंगाची फुले, कपडे, पांढरा पवित्र धागा किंवा पांढरे चंदन गणपती बाप्पाला अर्पण करू नये.
- बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी...
- गणपतीला तुळशीची पानं अर्पण करू नका.
- भगवान श्री गणेशाला फळांमध्ये केळी खूप आवडतात.
- बाप्पाची मूर्ती पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावी.
- पूजेमध्ये निळ्या, काळ्या रंगाचे कपडे घालू नका.
- दुर्वा आणि मोदकाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
- गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केल्यानंतर ती हलवू नका आणि एकटी सोडू नका. कोणतीतरी घरात राहणं गरजेचं आहे.
- दुर्वांच्या वरच्या टोकाला तीन किंवा पाच पाने असणे हे शुभ असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT