Maharashtra Weather: राज्यात परतीच्या पावसाची पुन्हा बॅटिंग? 'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल

point

मुंबईत आज हवामानाचा अंदाज काय? 

point

ऊन, पाऊस... काही भागांत संमिश्र वातावरण!

Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याचे जाणवत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा तर, काही ठिकाणी मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. अशावेळी आज (16 ऑक्टोबर) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. चला तर मग, तुमच्या शहरातील हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. (maharashtra weather forecast rainfall yellow alert to these districts october heat IMD report today 16 october 2024)

ADVERTISEMENT

मुंबईत आज हवामानाचा अंदाज काय? 

ठाणे आणि मुंबईत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील चार दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशींच्या व्यक्ती प्रेमात असतात लकी! तुमचं लव्ह लाईफ कसं राहील?

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशातून परतीची वाटचाल केलेली असतानाही राज्यात पावसाला पोषक हवामान मिळत आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ऊन, पाऊस... काही भागांत संमिश्र वातावरण!

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गेल्या रविवार, सोमवार, मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस असे चित्र येथे पाहायला मिळाले. मराठवाड्यातील तापमानाचा पारा 32 अंशांच्या पार गेला असून एकीकडे ऑक्टोबर हिटचे चटके तर एकीकडे पाऊस असे चित्र आहे.

ADVERTISEMENT

आज पुन्हा एकदा काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संभाजीनगरमध्ये आज 29 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT