Maharashtra Weather : थंडी गेली कुठे? दमट हवा, ढगाळ वातावरण! राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री?
Maharashtra Weather IMD Alert Report : राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल
राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री?
हवामान विभागाचा आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा
Maharashtra Weather IMD Alert Report : राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळाला आहे. पण काही भागात अजूनही अवकाळी पावसाचं संकट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना या संदर्भात इशारा दिला आहे हे सविस्तर जाणून घ्या. (maharashtra weather forecast update Today 16 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune kolhapur nagpur)
ADVERTISEMENT
राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री?
Weather of these City Maharashtra : कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे, त्यामुळे थंडीची प्रतीक्षा कायम आहे. अवकाळी पावसाचामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Ajit Pawar: 'प्रतिभा काकींना विचारणार, अजितला पाडण्याकरिता त्या घरोघरी...?', अजितदादा असं का म्हणाले?
उत्तर महाराष्ट्रात थंडीने चांगला जोर धरलेला आहे. मात्र हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले; "मी शर्यतीत..."
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT