Manoj Jarange Patil चा इशारा! “आंदोलन स्थगित नाही, पुन्हा मुंबईत धडक मारेन”

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Manoj Jarange warns to shinde government. he said if ordinance will cancel then i'll start protest again
Manoj Jarange warns to shinde government. he said if ordinance will cancel then i'll start protest again
social share
google news

Manoj Jarange Patil Latest News : सगेसोयरे शब्दाची व्याख्या करणारा आणि कुणबी जात प्रमाणपत्र असणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना जातीचे दाखले देण्यासंदर्भातील अध्यादेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्याचबरोबर अंतरवाली सराटीसह राज्यात इतरत्र दाखल करण्यात आलेले मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. या दोन्ही मागण्यांसह इतर सर्व मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या. त्यानंतर बोलताना मनोज जरांगे यांनी आंदोलनासंदर्भात मोठं विधान केलं. (Manoj Jarange Reaction after Shinde government grant to ordinance regarding OBC Reservation)

ADVERTISEMENT

उपोषण सोडण्यापूर्वी मनोज जरांगेंची रॅली निघाली. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजाला मिळू देणार नाही, अशी भाषा करत होते. सगेसोयऱ्यांचं मिळू देणार नाही, म्हणत होते. जशी एखाद्याला जमीन असते आणि त्याचा सातबारा नसतो, तसा प्रकार झाला होता. सगेसोयरेत घ्यायचं मग त्याचा कायदा पाहिजे. कायदा बनवला की नाही. लोक म्हणाले होते नाही बनणार”, असे मनोज जरांगे यांनी सरकारच्या निर्णयानंतर सांगितले.

छगन भुजबळांना जरांगेंनी काय दिलं उत्तर?

“छगन भुजबळला काहीही सांगायचं नाहीये. त्याचा कार्यक्रमच संपलेला आहे. पुढे अडचणी जरी आल्या तरी हा पठ्ठ्या लढणार आहे. पुन्हा आमरण उपोषण करेन, पण सगेसोयरे या कायद्यासाठी पुन्हा मुंबईत धडक मारेन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच पुढे ते म्हणाले, “आज कायदा झाला आहे. अध्यादेश घेतला नाही, तर बापाचं नाव बदलेन म्हणालो होतो. हे सगळे श्रेय महाराष्ट्रातील मराठ्यांचे आहे. त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे”, अशा भावना जरांगे पाटलांनी व्यक्त केल्या.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘सगेसोयरे’चा अध्यादेश निघाला, जरांगे जिंकले! मध्यरात्री काय घडलं?

“आंदोलन स्थगित नाही, अंतरवालीमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळे जण पुढे काय करायचं आहे, याबद्दल निर्णय घेऊ. स्थगित शब्द बोलताना माझ्याकडून गेला, पण मला असं म्हणायचं होतं की, सगळ्यांचा विचार घेऊन तिथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवू, असे मला म्हणायचे होते, पण स्थगित शब्द तोंडून निघून गेला”, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.

अध्यादेश चॅलेंज होणार नाही -मनोज जरांगे पाटील

अध्यादेश निघाला, पण याला न्यायालयामध्ये आव्हान दिले जाऊ शकते, मग हे टिकवायची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “सरकारची. काही होणार नाही, चॅलेंज. मराठ्यांचं ते काहीही चॅलेंज करतील. आम्ही मागास असूनही चॅलेंज केलं. शेवटी कायदा झाला की नाही. सगेसोयरेचा कायदा झाला आहे”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT