Manoj Jarange : 'प्रचाराच्या गाड्या गोठ्यात ठेवा', जरांगेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

राहुल गायकवाड

Manoj jarange patil warn eknath shinde government :' मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका', अशी विनंती जरांगेंनी (Manoj Jarange Patil) निवडणूक आयोगाला केली. 'पण तरीही जर निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या आणि आपल्या गोठ्यात लावा', असे आव्हान जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.

ADVERTISEMENT

manoj jarange patil warn eknath shinde government maratha reservation election commision lok sabha election
'पण तरीही जर निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या आणि आपल्या गोठ्यात लावा', असे आव्हान जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर यायचं नाही'

point

'प्रचाराच्या गाड्या आपल्या दारातून परत जणार नाहीत'

point

'सगेसोयरेची अंमलबजावणी सरकारने 2 दिवसात करावी'

Manoj jarange patil warn eknath shinde government : 'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय झाल्याचा' आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केला होता. या आरोपानंतर 'मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका', अशी विनंती जरांगेंनी (Manoj Jarange Patil) निवडणूक आयोगाला केली. 'पण तरीही जर निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या आणि आपल्या गोठ्यात लावा', असे आव्हान जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.  (manoj jarange patil warn eknath shinde government maratha reservation election commision lok sabha election) 

अंतरावली सराटीत मनोज जरांगे पाटलांची बैठक सूरू आहे. या बैठकीतून बोलताना जरांगे म्हणाले की, 'राजकीय नेत्यांनी, आमदार, खासदार, मंत्र्यांनी आमच्या दारासमोर यायचं नाही आणि त्यांच्याही दारात कोणी जायचं नाही, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. 

हे ही वाचा : धक्कादायक! महाप्रसादातून 500 जणांना झाली विषबाधा

तसेच जरांगे पाटलांनी यावेळी निवडणूक आयोगाला विनंती केली. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. जर निवडणूक घेतली तर प्रचारासाठी आलेल्या गाड्या, आपल्या दारातून परत जणार नाहीत. त्या गाड्या आपल्या गोठ्यात नेवून लावायच्या आणि निवडणूक झाल्यावर त्यांना परत करायच्या. गाडी फोडायची नाही आणि पेटवायची नाही, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच जर ही गोष्ट करायची नसेल तर त्यांना फोन करून सांगा, दादा आमच्या गावात येऊ नका, असे जरांगेंनी मराठा समाजाला सांगितले. 

येत्या 24 तारखेपासून आंदोलन करणार 

दरम्यान सगेसोयरेची अंमलबजावणी सरकारने 2 दिवसात करावी. जर नाही केली तर येत्या 24 तारखेपासून आंदोलन करणार, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला. 24 तारखेपासून प्रत्येकाने आपआपल्या गावात  रास्ता रोको आंदोलन करायचं, असे जरांगेंनी सांगितले. 

हे ही वाचा : कोण आहेत अनिल मसिह?, एकच वाद नाही तर...

सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत आंदोलन करायचं. पोलिसांनी परवानगी दिली तरी करायचं आणि नाही दिली तरी करायचंच. आणि पोलिसांनी मुलांवर केस करायची नाही. जर विनाकारण केली तर गावाने पोलीस स्टेशनला जाऊन बसायचं, असेही जरांगेंनी सांगितले आहे. तसेच सगेसोयरेची अंमलबजालणी करण्यासाठी रोज निवेदन द्याचयं. विशेष म्हणजे अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही, अशाही सूचना जरांगेंनी मराठा समाजाला केल्या आहेत.  

ज्येष्ठ नागरिकांसह उपोषणाला बसणार 

दरम्यान आपल्या राज्यात 25-30 लाख मराठे ज्येष्ठ नागरिक असतील. त्यांनी सगळ्यांनी माझ्यासह आमरण उपोषणाला बसायचं. त्यातल एक जरी गेलं तरी त्यांची जबाबदारी फडणवीस आणि शिंदे यांची असेल, असा इशारा जरांगेनी सरकारला दिला आहे. इतकंच नाही तर खेड्यातून शहरात कोणी पोरग गेलं आणि त्याला कुठल्या नेत्याने त्रास दिला तर गावात त्याने येऊन  सांगायचं. त्रास दिला तर जशाच तसा त्रास दिला जाईल, असेही जरांगेंनी यावेळी सांगितले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp