Video : मराठा सर्वेक्षणाचा सावळा गोंधळ, पहिली पास व्यक्तीकडून होतोय सर्वे
दरम्यान जर अशा चुकीच्या पद्धतीने सर्वे झाला तर आम्हाला आरक्षण भेटणार आहे, जे आमच्या हक्काचे आहे, असा सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे.
ADVERTISEMENT
Maratha Survay Viral Video, Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यभरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणातला सावळा गोंधळ समोर आला आहे. पहिली पास असलेल्या व्यक्तीच्या हातात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने देखील आपली शैक्षणिक पात्रता नसताना आपल्या हातात हे काम दिल्याचे म्हटले आहेत. या संबंधित व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे जर सर्वेक्षण होत असेल तर मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहेत. (maratha reservation state commission backward class survay viral video first standard pass candidate shocking story manoj jarange patil)
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडिओत काय?
राज्यभरात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणा दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओती व्यक्तीचे नाव मनोज काशिनाथ कांबळे आहे. हा व्यक्ती निव्वळ पहिली पास आहे आणि महापालिकेत इलेक्ट्रीक मदतनीस म्हणून काम करतोय. या व्यक्तीच्या हाती मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती.
हे ही वाचा : Crime : अकोला हादरलं! आधी प्रेयसीचा गळा चिरला मग स्वत:ला संपवलं
धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरात मोबाईलवर सर्वेक्षण सुरू आहे, मात्र व्हिडिओतील व्यक्ती ही वहीवर सर्वेक्षण करत आहे. त्यातही त्याला काही बाजू कळत नाही आहेत,यासाठी त्याने त्याच्या जोडीला दुसरा एका मुलालाही हाताशी घेतले आहे. तसेच त्याची ट्रेनिंग झाली आहे, मात्र शिक्षण कमी असल्याने मला जास्त यातलं काही कळत नसल्याचेही त्यांनी कबूल केले आहे.
हे वाचलं का?
सर्वेक्षणात संबंधित व्यक्ती फक्त नाव, नंबर, आधारकार्ड इतकीच माहिती गोळा करत आहेत. तसचे त्याला घर आहे का? काय काम करतो? असे प्रश्न विचारले असता. तो म्हणाला, मला तर काय यातलं कळत नाही. मी इलेक्ट्रीक मदतनीस आहे, पण शिक्षण पात्रता नसल्याने अनुभव नाही. तुम्हाला मोबाईल हाताळात येतो का? मग तुम्ही सर्वे कसा करणार? असे विचारले असता, मी अधिकाऱ्यांनाही सांगितले की मला यातलं काही जमत नाही. आता ते म्हणाले आता माझ्याकडे काही नाही तुम्ही तुमचं बघा. त्यामुळे हे सर्वेक्षण करत असल्याचे संबंधित व्यक्तीने कबूल केले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : संदीप राऊतांच्या ED नोटीसीवर राऊत कडाडले, ‘फडणवीसांच राज्य आहे की अफजलखान…’
मराठा सर्वेक्षणाचे इतक्या जबाबदारीचे काम सूरू आहे आणि ही अशी अवस्था आहे. दरम्यान जर अशा चुकीच्या पद्धतीने सर्वे झाला तर आम्हाला आरक्षण भेटणार आहे, जे आमच्या हक्काचे आहे, असा सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT