Nashik: ‘काम असेल तर माझ्याकडे येता, आणि मतदान…’, राज ठाकरे शेतकऱ्यांना असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mns president raj thackeray taunted farmers of nashik over voting
mns president raj thackeray taunted farmers of nashik over voting
social share
google news

Raj Thackeray Nashik: प्रविण ठाकरे, नाशिक: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या दोन दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांची काही शेतकऱ्यांनी खास भेट घेतली. यावेळी शेतकरी जिल्हा बँक आणि शेतमालाला मिळणाऱ्या हमीभावाविषयी संबंधित विषयावर राज ठाकरे यांच्याशी बोलत होते. मात्र, त्याचवेळी राज ठाकरे यांनी जे भाष्य केलं त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (mns president raj thackeray taunted farmers of nashik over voting)

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातील एक शेतकरी जेव्हा आपलं गाऱ्हाणं राज ठाकरेंसमोर मांडत होता. तेव्हाच राज ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले की, ‘मागे एकदा शेतकऱ्यांनी संप केला होता.. हे आठवतंय? त्यावेळेस काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. 20-25 जणं होते. त्यांना मी सांगितलं की, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता.. आणि मतदानाच्या वेळेला त्या लोकांना मतदान करता. तर त्यांनी सांगितलं की, साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं.’

‘म्हणजे जे तुम्हाला मदत करत नाहीत. त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे का येता?’ असा सवालच राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना यावेळी विचारत.. एकप्रकारे मनसेला न होणाऱ्या मतदानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘…त्यांना मतदान केलं तर या चाबकानेच मारीने’

दरम्यान, याचवेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना सरकारविरोधात आपली नाराजी जाहीर करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात एक आसूड (चाबूक) राज ठाकरेंना भेट दिला. त्यावेळी राज ठाकरे तात्काळ मिश्किलपणे म्हणाले की, पुन्हा त्यांना मतदान केलं तर या चाबकाने मारेन.’

हे ही वाचा >> BJP: ‘तुमची पदं भाजपमुळे हे विसरू नका’, मंत्री उदय सामंत-दादा भुसेंना भाजप सहमुख्य प्रवक्त्याने सुनावलं

जिल्हा बँकांकडून जी बळजबरी जी कारवाई केली जाते त्याबाबत याआधीही राज ठाकरेंनी मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांची आणि शेतकऱ्याची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन राज ठाकरेंनी दिले आहे.

ADVERTISEMENT

शेतकरी म्हणतात.. आता शेवटचा पर्याय म्हणून राज ठाकरेंकडे नेतृत्व देणार…

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे शिष्टमंडळ हे राज ठाकरेंकडे आलं होतं. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आतापर्यंत अनेक शेतकरी नेत्यांनी नेतृत्वाच्या नावाखाली आमच्या तोंडाला पानं पुसली आहेत. मात्र, आता आम्ही शेवटची आशा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहत आहोत. शेतकऱ्यांचे नेते म्हणून आम्ही त्यांना एक संधी देणार आहोत. असं शेतकरी यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंचं पुन्हा मिशन नाशिक?

2012 साली नाशिककरांनी मनसेच्या पदरात भरभरून मतदान केलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंचा पक्षाला नाशिकच्या मतदारांनी एकहाती सत्ता दिली होती. राज ठाकरे हे आपल्या भाषणात शहरांचा कायापालट घडवून आणण्याबाबत नेहमी बोलायचे. त्यामुळेच त्यावेळी नाशिककरांनी त्यांना संधी दिली होती. मात्र, पुढील पाच वर्षात नाशिकमध्ये मनसेला फारशी चमक दाखवता आली नाही. ज्याची परिणिती ही 2017 मध्ये त्यांना पाहायला मिळाली. त्यांची महानगरपालिकेतील सत्ता ही नाशिककरांनी हिसकावून घेतली.

हे ही वाचा >> छाटलेला महिलेचा मृतदेह, ‘ती’ गोणी बघून पोलिसांनाही फुटला घाम!

पण आता गेल्या काही वर्षात राज्यातील राजकीय परिस्थिती ही पूर्णपणे बदलली आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मिशन नाशिक हाती घेतल्याचं बोललं जात आहे. त्यासाठीच राज ठाकरे हा दोन दिवसीय नाशिक दौरा असल्याचं बोललं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT