सप्टेंबरपासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 rule change from 1st september 2023 lpg cylender adhar update credit card rules there rules are change from september
प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला अनेक नियम बदलत असतात.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला अनेक नियम बदलतात

point

या नियमांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो

point

सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत?

Rule change 1st September : प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला अनेक नियम बदलत असतात. या  नियम बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होत असतो. जसे एलपीजी (LPG), सीएनजीचे (CNG) दर, बँके संबंधीत नियम अशा अनेक गोष्टीचे नियम बदलत असतात. त्यामुळे आता 1 सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत. या नियम बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर कसा परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊयात. ( rule change from 1st september 2023 lpg cylender adhar update credit card rules there rules are change from september)

सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर आणि एफडीचे नियम समाविष्ट आहेत. हे बदल तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (डीए वाढ) भेट देऊ शकते. त्यामुळे सप्टेंबरपासून काय काय बदलणार आहे? हे जाणून घेऊयात. 

LPG च्या किंमतीत बदलणार 

एलपीजी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आला आहे. कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात. अशा परिस्थितीत यावेळी एलपीजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फेक कॉल

उद्यापासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार आहे. कारण ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल्स आणि फेक मेसेजवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ट्रायने कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने Jio, Airtel, Vodafone, Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : आजच भरून घ्या अर्ज..., 3000 मिळवण्यासाठी उरले शेवटचे काही तास!

CNG-PNG

एलपीजी सिलिंडरबरोबरच, हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीही तेल बाजारातील कंपन्या दर महिन्याला बदलतात. पुढच्या महिन्यातही ते बदलण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

क्रेडिट कार्ड 

HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित केली आहे, हा नियम 1 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल. या अंतर्गत, ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2,000 पॉइंट मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही.

ADVERTISEMENT

IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करेल. पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाईल. याशिवाय, 1 सप्टेंबर 2024 पासून, UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

महागाई भत्त्यात वाढ 

केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे, तर 3 टक्क्यांच्या वाढीनंतर तो 53 टक्के होईल.

हे ही वाचा : IMD Todays Rain Update: मुंबईत धो धो कोसळणार? पुढील २४ तासांसाठी पावसाची स्थिती काय?

आधार अपडेट 

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर, तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही. 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. तथापि, यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती.

गुंतवणुकीशी संबंधित नियम 

IDBI बँकेने 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. इंडियन बँकेने 300 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तर पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. एसबीआय अमृत कलश स्पेशल एफडी योजनेची अंतिम मुदतही 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. म्हणजेच सप्टेंबरनंतर या एफडी योजनांमध्ये कोणतीही गुंतवणूक होणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT