Laddu Mutya: शिखर धवनही झाला लड्डू मुत्या, गरगर फिरणारा पंखा.. Video तुम्हीच पाहा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

shikhar dhawan becomes laddu mytya hilarious instagram reel pankha wala baba mimics video team india cricketer
गब्बरही झाला लड्डू मुत्याचा फॅन
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिखर धवन बनला लड्डू मुत्या बाबा

point

गरगरनारा पंखाच थांबवला

point

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Shikhar Dhawan Viral Video : किक्रेटच्या मैदानात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांना घाम फोडणारा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शिखर धवन हल्ली सोशल मीडियावर खुपच सक्रिय असतो. सोशल मीडियावर मजेदार ट्रेडिंग व्हिडिओ बनवून तो सध्या चाहत्यांचे मनोरंजन करतोय. अशात सध्या सोशल मीडियावर लड्डू मुत्या बाबाची तुफान क्रेझ आहे. या बाबांसारखा व्हिडिओ आता शिखर धवनने बनवला आहे. शिखरचा व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी लोटपोट हसतायतय. त्यामुळे या व्हिडिओत काय आहे? हे जाणून घेऊयात.  (shikhar dhawan becomes laddu mytya hilarious instagram reel pankha wala baba mimics video team india cricketer) 

क्रिकेटच्या मैदानात धुवाधार फलंदाजी करण्यासोबत शिखर धवनला सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला देखील आवडते. या कारणामुळेच त्याच्या इस्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्या अशाच एका व्हिडिओमुळे शिखर धवन चर्चेत आला आहे. नेमकं त्याने व्हिडिओत काय केलंय. हे जाणून घेऊयाच. 

हे ही वाचा : Mia Khalifa: आरारारा खतरनाक! पॉर्न स्टार मिया खलिफासाठी आजोबांचा करवा चौथ, चक्क...

इंस्टाग्रामवर सध्या लड्डू मुत्या बाबांची प्रचंड क्रेझ आहे. इंस्टाग्राम उघडल्या उघडल्या लड्डू मुत्या बाबाची आरती सूरू होते. आणि जोरात फिरणारा पख्खा बाबा त्याच्या हाताने थांबवतात, आणि तोच हात नंतर त्यांच्या भक्तांच्या डोक्यावर फिरवतात. अशा आशयाचा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असाच व्हिडिओ आता अनेक नेटकरी बनवत आहेत.क्रिकेटर शिखर धवनने सुद्धा याच ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे. आणि लड्डू मुत्या बाबासारखा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता शिखर धवन एका खुर्चीवर बसवला आहे. आणि त्याचे सहकारी त्याच्याभोवती उभे आहेत. काही वेळानंतर शिखर धनवचे सहकारी त्याला खुर्चीसह उचलतात आणि त्यानंतर त्याला पंख्याजवळ नेतात. पंख्याजवळ पोहोचताच शिखर धवन हाताने तो पख्खा बंद करतो. त्यानंतर त्याच हाताने शिखर धवन त्याच्या इतर सहकाऱ्यांना आशिर्वाद देतो. अशाप्रकारचा हा व्हिडिओ आहे.

हे ही वाचा : Chanakya Niti : लग्नानंतरही महिला परपुरूषाकडे का होतात आकर्षित? 'ही' आहेत कारणे?

शिखर धवनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे. आतापर्यंत 3 लाखाहून अधिक महिलांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT